घरमुंबईड्रेनेजमध्ये गुदमरुन तीन कामगारांचा मृत्यू!

ड्रेनेजमध्ये गुदमरुन तीन कामगारांचा मृत्यू!

Subscribe

पनवेलच्या काळुंदे गावात गटारीमध्ये साफसफाईसाठी उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

साफसफाईसाठी ड्रेनेजमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा दुर्गंधीमुळे मृत्यू झाला आहे. ही घटना पनवेलच्या काळुंदे या गावत घडली आहे. या घटनेमध्ये जीव गमावलेले तिनही कामगार सिडकोचे आहेत. ते गटार साफ करण्यासाठी गटारीमध्ये उतरले होते. दरम्यान, दुर्गंधीमुळे त्यांचा श्वास गुदमरला आणि त्यांचा जीव गेला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेसंबंधी माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मृत कर्मचारींना बाहेर काढण्याचे प्रयत्न करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -