युतीबाबत सकारात्मक चर्चा – मुख्यमंत्री

युतीबाबत सकारात्मक चर्चा – मुख्यमंत्री

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप – शिवसेनेची युती होणार की नाही? यावर बऱ्याच चर्चा रंगत आहेत. अखेर व्हॅलेंटाईन्स डे’चा मुहुर्त साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

युतीचा निर्णय लवकरच…

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. मातोश्रीवर त्यांच्यामध्ये बैठक झाली असून युतीबाबत चर्चा झाली. पुलवामाच्या घटनेमुळे फारकाळ चर्चा केली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जी काही चर्चा झाली ही सकारात्मक झाली आहे. शिवसेनाचा आग्रह शेतकऱ्यांचे प्रश्न, सामान्य नागरिकांचे प्रश्न आणि योजनांसंदर्भात आहे. त्याला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे कारण ते सार्वजनिक प्रश्न आहेत. भाजपची देखील तिच मानसिकता आहे. त्यामुळे त्याचावर आम्ही निश्चिपणे एकमत करु आणि लवकरच योग्य प्रकारे पुढे जाऊ असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. युतीबाबत आमची सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत काय निर्णय होतोय ते आम्ही लवकरच कळवू असे देखील त्यांनी सांगितले.

पुलवामा हल्ल्याचा निषेध

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांनी निषेध केला आहे. भारत हे खपवून घेणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे. तसंच याचा प्रतिरोध आणि प्रतिशोध निश्चितपणे घेतला जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. जे लोक देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात त्यांना कधीत यशस्वी होऊन देणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

First Published on: February 14, 2019 10:32 PM
Exit mobile version