DongriBuildingCollapse : ‘याचा धोकादायक इमारतीच्या यादीत समावेश नव्हता’

DongriBuildingCollapse : ‘याचा धोकादायक इमारतीच्या यादीत समावेश नव्हता’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतील डोंगरी परिसरात कोसळलेल्या कौसरबाग इमारतीचा धोकादायक इमारतीत समावेश नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. इमारत कोसळ्याची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य घटनास्थळी पोहोचवण्याचे आदेश आपण दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री 

दुर्घटनाग्रस्त इमारत ही १०० वर्षे जुनी होती. परंतू तिचा धोकादायक इमारतीच्या यादीत तिचा समावेश नव्हता. पुनर्विकासासाठी इमारत विकासकाकडे दिली होती. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. घडलेल्या घटनेची चौकशी होईलच पण सध्या अडकलेल्यांना बाहेर काढणं गरजेच आहे. एकूणच हा परिसर दाटीवाटीचा आहे. त्यामुळे बचावकार्यावर भर देणे आवश्यक आहे. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून जखमींना तातडीने मदत करावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. अद्याप मृतांबाबतची संपूर्ण माहिती मिळालेली नाही.

काय आहे घटना 

मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डोंगरीच्या बाबा गल्लीत चार मजली इमारत कोसळली आहे. इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटानास्थळी दाखल झाले आहे. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक प्रयत्न करत होते. यानंतर अग्निशमन दलाचे आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे.

First Published on: July 16, 2019 2:06 PM
Exit mobile version