Ujjwal Nikam : उमेदवारी जाहीर होताच उज्ज्वल निकम म्हणतात, राजकारण करणार नाही

Ujjwal Nikam : उमेदवारी जाहीर होताच उज्ज्वल निकम म्हणतात, राजकारण करणार नाही

मुंबई : भाजपाने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत उत्तर मध्य मुंबई लोकसभेतून महायुतीने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यात लढत होणार आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर उज्ज्वल निकम म्हणतात, राजकारण करणार नाही. (Lok Sabha Election 2024 Senior lawyer Ujjwal Nikam has been announced candidate by BJP from North Central Mumbai Constituency)

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. राजकारण हे माझ्यासाठी नवीन क्षेत्र मला आहे. परंतु माझा प्रमाणिक प्रयत्न जे कोणी देशद्रोही करतील त्यांच्या विरोधात कायद्याची कठोर अंमलबजावणी, सामान्य गरीब माणसाला न्याय कसा मिळेल, हे पाहणे असेल. परंतु मी राजकारण नवीन असलो तरी राजकारण कुठेही करणार नाही. समाजकारण करत सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी करणार, असे उज्ज्व निकम यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : दुसऱ्या टप्प्यानंतर भाजपा, एनडीए 2-0 ने पुढे; निकालाआधीच मोदींकडून विश्वास व्यक्त

उज्ज्वल निकम म्हणाले की, वर्षा गायकवाड या माझ्याविरोधातील उमेदवार आहेत आणि त्यांना मोठा राजकीय अनुभव आहे, याची मला कल्पना आहे. पण माझा जन्म हा हनुमान जयंतीला झाला आहे. मी आतापर्यंत मुंबईत अनेक महत्त्वाचे खटले चालवले आहेत. त्यात देशाची सुरक्षा, देशाचं सार्वभौमत्व आणि त्याचप्रमाणं संघटित गुन्हेगारीपासून या मुंबापुरीला वाचवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे कुठलंही आव्हान स्विकारण्याची माझी तयारी आहे. जळगावच्या कडक उन्हात मी वाढलो आहे. त्यामुळे राजकारण करणार नाही याची मी ग्वाही देतो, असा पुनरुच्चार उज्जव निकम यांनी केला.

पूनम महाजनांचा पत्ता कट

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सुरू होती. भाजपाकडून त्यांना उत्तर मध्य मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात येणार, असेही सांगण्यात येत होते. यासंदर्भात पक्षाकडून चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता भाजपाने मोठी खेळी खेळत एक मोठा आणि प्रतिष्ठित चेहरा उमेदवार म्हणून घोषित केला आहे. मात्र उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांता पत्ता कट झाला आहे. पूनम महाजन यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभेचे तब्बल 10 वर्ष खासदार पद भूषविले आहे. पण मागील पाच वर्षांमध्ये त्यांनी आपल्या मतदारसंघात फारसे काम न केल्याने आणि मतदारांसोबत संपर्कही न ठेवल्याने त्यांच्याबद्दल नाराजी दिसून येत होती. काही महिन्यांपूर्वी भाजपाने केलेल्या सर्वेक्षणातही मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी दिसून आली. त्यामुळे पक्षाने पूनम महाजन यांचा पत्ता कट करत नव्या उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मंगळसूत्रावर गंडांतर यांच्यामुळेच; उद्धव गटाची पंतप्रधान मोदींवर टीका

First Published on: April 27, 2024 5:52 PM
Exit mobile version