मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विखे पाटलांच्या पक्षप्रवेशाचं गुपित!

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विखे पाटलांच्या पक्षप्रवेशाचं गुपित!

मुख्यमंत्र्यांनी उलगडलं राधाकृष्ण विखे पाटलांच्या पक्षप्रवेशाचं गुपित!

बुधवारी भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ ज्येष्ठ नेत्यांसोबतच अनेक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, विनोद तावडे आदी भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालिदास कोळंबकर, मधुकर पिचड, वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ, संदीप नाईक आदी पक्षप्रवेश करणाऱ्या नेतेमंडळींचं स्वागत केलं. मात्र, त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपप्रवेश नक्की कसा झाला? यामागचं गुपित सांगितलं!

…गणेश नाईक यांनाही यावं लागेल!

मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सर्वच पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांचं कौतुक करत त्यांचं भाजपमध्ये स्वागत केलं. मात्र, यावेळी ‘संदीप नाईक यांच्यापाठोपाठ त्यांचे वडील गणेश नाईक यांनाही यावंच लागेल’ असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना आम्ही पक्षात कसं घेतलं हे उपहासानं सांगितलं.


हे वाचलंत का? – पक्षप्रवेश झाले, ताकद वाढली; आता युतीवर वाचा काय म्हणतात मुख्यमंत्री!

काय म्हणाले मुख्यमंत्री?

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘आम्ही हुशार आहोत. आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे नाही गेलो. आम्ही सुजय विखे पाटील यांना घेतलं. राधाकृष्ण पाटील आपोआप आले. आम्ही वैभव पिचड यांना घेतलं. मधुकरराव पिचड हे देखील आले. त्यामुळे संदीप नाईक आणि त्यांच्यासोबत नवी मुंबईतले नगरसेवक देखील आले. मग आता गणेश नाईक साहेबांना देखील त्यांना आशिर्वाद द्यावाच लागेल’, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला. यावेळी व्यासपीठावर बसलेले राधाकृष्ण विखे पाटील हदेखील हसत होते.

First Published on: July 31, 2019 11:42 AM
Exit mobile version