Bigg Boss Controversy: कलर्सचा मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत तर राज ठाकरेंना मराठीत माफीनामा

Bigg Boss Controversy: कलर्सचा मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत तर राज ठाकरेंना मराठीत माफीनामा

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कलर्स वाहिनीवरील बिग बॉस हा रियालिटी शो नेहमीची वादाच्या भोवऱ्यात सापडतो. यावेळी या शोमध्ये मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अपमान करण्यात आला. त्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत माफी मागायला लावली. त्यानुसार वायकॉम १८ ने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना माफीनामा दिला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याआधी वायकॉम १८ ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील याबाबत माफीनामा दिला होता. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माफीनामा इंग्रजीत दिला, तर राज ठाकरे यांना माफीनामा मराठीत दिला आहे.

बिग बॉस शोमध्ये जान सानू या स्पर्धकाने मराठी भाषेचा अवमान केल्याप्रकरणी आज राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आक्रमक भूमिका घेत २४ तासांच्या आत माफी माग. अन्यथा चित्रिकरण बंद पाडू, असा धमकी वजा इशारा दिला होता. यानंतर कलर्स या मनोरंजन वाहिनीने माफीनामा दिला आहे.

शिवसेनेची आक्रमक भूमिका

Rajशिवसेनेने देखील मराठी भाषेच्या अवमान प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. आमदार प्रताप सरनाईक यांनीही कलर्स वाहिनीच्या अधिकाऱ्यांना मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या स्पर्धकाची शोमधून हकालपट्टी करा, अशी मागणी केली. जर हकालपट्टी केली नाही तर चित्रीकरण बंद पाडू, असा इशारा दिला होता. मनसे आणि शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर काही तासांपूर्वी कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील या प्रकरणी माफीनामा सादर केला आहे.

First Published on: October 28, 2020 11:50 PM
Exit mobile version