विक्रोळीत सोशल मीडियावर आचारसहिंता भंग केल्याचा गुन्हा दाखल

विक्रोळीत सोशल मीडियावर आचारसहिंता भंग केल्याचा गुन्हा दाखल

निवडणूक आयोगाने या निवडणुकामध्ये सोशल मीडियावर आचारसहिंता लागू केल्यानंतर मुंबईत सोशल मीडियावर आचारसहिंता भंग केल्याची तक्रार नगरसेवकाने विक्रोळी पोलिस ठाण्यात केली आहे. या तक्रारीवरून विक्रोळी पोलीस ठाण्यात व्हाट्सअप ग्रुपच्या एका सदस्यावर आचारसहिंतेचा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.

घाटकोपर वार्ड क्रमांक १६४ चे नगरसेवक हरीश भांदिर्गे हे ‘सुंदरबाग कट्टा’ या व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये सदस्य आहेत. याच ग्रुपमध्ये सदस्य असलेल्या उमेश गिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो या ग्रुपवर व्हायरल केला. या फोटोसह बदनामीकारक मजकूरही त्यांनी फॉरवर्ड केला होता. याबाबत भांदिर्गे आक्षेप घेऊन, गिरी यांनी सोशल मीडियावर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत भांदिर्गे यांनी विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आचारसहिंता भंग केल्याचा पहिलाच गुन्हा

विक्रोळी पोलीसांनी या प्रकरणी उमेश गिरी यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तसेच देशाचे पंतप्रधान यांची बदनामी करून अब्रुनुकसान केल्याप्रकरणी अदखलपत्राचा गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर आचारसंहिता लागू केल्यानंतर मुंबईतील विक्रोळी येथे सोशल मीडियावर आचारसहिंता भंग केल्याचा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे.


हे ही वाचा – आचारसंहिता म्हंजी नक्की काय भानगड असती रं भौ?

First Published on: March 22, 2019 11:38 AM
Exit mobile version