गुजरातच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो; गुजरात पराभवानंतर राहुल गांधींचं ट्विट

गुजरातच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो; गुजरात पराभवानंतर राहुल गांधींचं ट्विट

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. एकूण 182 जागांपैकी 156 जागांवर भाजपाला बहुमत मिळाले आहे. तर काँग्रेसला केवळ 17 जागांवर विजय स्थापित करण्यात यश आल्याचे चित्र आहे. यात आम आदमी पक्षाला केवळ 5 जागांवर विजय मिळाला आहे, मात्रला काँग्रेस गुजरातमध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा पराभव आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी स्वीकारला आहे. राहुल गांधी यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.

राहुल गांधींनी स्वीकारला गुजरातमधील पराभव

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की, गुजरातच्या जनतेचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. देशाच्या आदर्शांसाठी आणि राज्यातील जनतेच्या हक्कांसाठी आम्ही पुन्हा संघटना बांधणी करू, कठोर परिश्रम करू आणि लढत राहू. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मानले गुजरात जनतेचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. मोदींनी ट्विटमध्ये लिहिले की, थँक्स गुजरात. निवडणुकीचे अभूतपूर्व निकाल पाहून मी खूप भारावून गेलो आहे. विकासाच्या राजकारणाला लोकांनी आशीर्वाद दिला आहे आणि ते अधिक वेगाने सुरू राहावे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. मी गुजरातच्या जनशक्तीला सलाम करतो. सर्व कष्टकरी कामगारांना मी सांगू इच्छितो – तुमच्यापैकी प्रत्येकजण चॅम्पियन आहे! आमच्या पक्षाची खरी ताकद असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांच्या अतुलनीय परिश्रमाशिवाय हा ऐतिहासिक विजय शक्य झाला नसता. असं ट्विट मोदींनी केलं आहे.


…अन् शिवरायांविषयी बोलताना अमोल कोल्हेंचा माईकच केला बंद

First Published on: December 8, 2022 5:51 PM
Exit mobile version