घरमहाराष्ट्र...अन् शिवरायांविषयी बोलताना अमोल कोल्हेंचा माईकच केला बंद

…अन् शिवरायांविषयी बोलताना अमोल कोल्हेंचा माईकच केला बंद

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी भाजप नेत्यांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. यावरून देशाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान छत्रपती शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्यांचे पडसाद संसदेतही उमटले. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून सातत्याने होत असलेल्या वादग्रस्त विधानासंदर्भात संसदेने खास कायदा करावा ही मागणी करण्यासाठी लोकसभेत बोलण्यासाठी उभे राहिले. यावेळी कोल्हे लोकसभेत बोलण्यासाठी उभे राहिले पण 3 वाक्यांनंतरच त्यांचा माईक बंद करून पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी त्यांच्या आवाज दाबला. छत्रपती शिवराय देव नाहीत पण देवापेक्षा आम्हाला कमी नाहीत. त्यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्याची कुणाची हिंम्मत होता कामा नये, असे अमोल कोल्हे सांगत असताना पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी हो गया हो गया, म्हणून विषय पूर्ण करण्याची सूचना केली. यानंतर पुढच्याच सेकंदाला अमोल कोल्हे यांची माईक बंद करण्यात आला. संसदेतील या प्रकारावर आता अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनास 7 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. दरम्यान भाजप नेते आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवरायांबद्दल होत असलेल्या अपमानकारक वक्तव्याप्रकरणी संसदेत विरोधकांनी निषेध व्यक्त केला. दरम्यान मविआ खासदारांच्या निदर्शानंतर आज संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शून्य प्रहारामध्ये शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संसदेत खास कायदा करावा, अशी मागणी केली. पण याचवेळी त्यांचा माईक बंद करण्यात आला.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचं नाही तर उभ्या हिंदुस्तानाचे दैवत आहेत. अनेक सरसेनापतींनी, राजा महाराजांनी छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेतली, आम्हा शिवभक्तांसाठी छत्रपती शिवराय देव नाहीत, पण देवापेक्षा कमी नाहीत, असं असतानाही महाराष्ट्रात सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली जात आहेत, असं अमोल कोल्हे अतिशय पोटतिडकीने संसदेत सांगत होते. याचदरम्यान पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी हो गया हो गया म्हणत अमोल कोल्हेंना खाली बसण्याची सूचना केली. यावेळी अमोल कोल्हेंना राग अनावर झाला आणि ते “हमें बोलने दिजीए…” म्हणत आपलं म्हणणे अतिशय त्वेषाने मांडत होते. पण अमोल कोल्हेंचा आक्रमक पवित्रा पाहता त्यांचा माईकचं बंद करण्यात आला.

- Advertisement -

संसदेतील या प्रकारावर आता अमोल कोल्हे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. मी जो विषय मांडणार होतो. त्या विषयाला शून्य प्रहारमध्ये वेळ देण्यात आला होता. पण वेळ देऊनही मला बोलू दिलं नाही. माझा आवाज दाबला गेला, माझं बोलणं सुरु झाल्यावर अवघ्या दोन, तीन वाक्यानंतर मला खाली बसण्याची सूचना करण्यात आली, हो गया हो गया म्हणत माझा माईक बंद केला.. संसदेतला माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही, तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही!!, असा इशारा अमोल कोल्हेंनी संसदेतील प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.


राष्ट्रीय पक्ष म्हणून…, गुजरात निकालावरून मनीष सिसोदियांनी दिली प्रतिक्रिया

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -