संतापजनक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ५ वर्षे कारावास

संतापजनक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ५ वर्षे कारावास

संतापजनक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ५ वर्षे कारावास

एका आठ वर्षीय मुलीचा शेजारी राहणाऱ्या तरुणाने विनयभंग केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबईतील एका न्यायालयाने आरोपीला पॉक्सो अंतर्गत पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सध्या आरोपी आर्थर रोड तुरुंगात आहे. त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. अब्दुल रहमान महबूब लोहार (३०) असे आरोपीचे नाव आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; मुंबईतील अँटॉप हिलमधील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने २९ जून २०१८ रोजी शेजारी राहणाऱ्या लोहार याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपीला मुंबईतील एका न्यायालयाने पॉक्सो अंतर्गत पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून सध्या आरोपी आर्थर रोड तुरुंगात असून त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार; दोन्ही मुली सार्वजनिक शौचालयात गेल्या होत्या. मुली शौचालयात गेल्या असता, तिथे वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अंधार होता. मोठ्या मुलीने तिच्या लहान बहिणीला मोबाईल आणायला सांगितला. दरम्यान, आठ वर्षांची मुलगी मोबाईल घेऊन शौचालयाकडे जात असताना अंधारात दबा धरून बसलेल्या शेजारच्या लोहार याने मुलीला पकडले. त्यानंतर तिला जबरदस्ती किस केला. त्यानंतर मुलीने आरडाओरडा केला. त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. घडलेल्या घटनेबाबत तिने मोठ्या बहिणीला सांगितले. त्यानंतर घाबरलेल्या दोन्ही मुली आपल्या घरी गेल्या. घडलेली सर्व घटना तिने आईला सांगितली.

या घटनेनंतर जाब विचारण्यासाठी या मुलींचे पालक शेजारच्या लोहारच्या घरी पोहोचले. मुलीच्या कुटुंबीयांनी बिनबुडाचे आरोप केले असल्याचे आरोपीच्या वकिलांनी सुनावणीवेळी सांगितले. दरम्यान, ८ वर्षीय पीडित मुलीने न्यायालयात आरोपीला ओळखले. पोलीस, डॉक्टर आणि न्यायाधीशांसमोर पीडितेने एकच जबाब नोंदवला. सुनावणीदरम्यानही मुलीने तेच सांगितले. त्यामुळे कुणावर खोटे आरोप करण्याचे काहीच कारण नाही, असेही पीडितेच्या वकिलांनी सांगितले. अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.


हेही वाचा – पालिका आयुक्तांची अदलाबदली हा कोरोनावरील उपाय नव्हे – दरेकर


 

First Published on: June 25, 2020 7:00 PM
Exit mobile version