दिलासादायक! मुंबईत कोरोनाची साखळी तुटणार,रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण घटणार

दिलासादायक! मुंबईत कोरोनाची साखळी तुटणार,रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण घटणार

Corona : कोरोनाची सौम्य लक्षणे अँटीबॉडी निर्माण करण्यासाठी मदत करतात- संशोधन

मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे मृत पावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. दररोज कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या ८० पर्यंत गेली आहे. त्यामुळे याप्रकरणी आम्ही राज्याच्या ‘टास्क फोर्स’ मधील तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यानुसार, कोरोनाची १४ दिवसांची साखळी असते. ही साखळी येत्या दोन ते तीन दिवसात संपुष्टात येणार आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण घटणार आहे. मृतांची संख्या ही कमी होणार आहे, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

लसीचा साठा आल्यावर लसीकरण सुरळीत होणार

सध्या मुंबईत लसीचा साठा कमी असल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीचा पहिला डोस प्राधान्याने देण्यात येत आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे थांबविण्यात आले होते. आज रात्री लसीचा साठा आल्यावर ४५ वर्षावरील नागरिकांचेही लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
वास्तविक, मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनावर जानेवारी २०२१ पर्यंत काहीसे नियंत्रण मिळवण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुन्हा फेब्रुवारी २०२१ च्या मध्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला.

दरम्यान, पालिकेने कोरोनाला रोखण्यासाठीच १६ जानेवारीपासून मुंबईत लसीकरण मोहिमेला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, नंतर फ्रंट लाईन वर्कर, पोलीस आदींना लसीकरण करण्यात आले. आता तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना १ मे पासून लस दिली जात आहे, असे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले. मात्र लसीचा साठा कमी प्राप्त झाल्याने पालिकेने ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देणे सध्या बंद ठेवले. मात्र १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र सोमवारी किंवा मंगळवारी रोजी सकाळी लसीचा साठा आल्यावर मुंबईत पुन्हा ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले जाईल. मुंबईत आतापर्यंत २५ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यातील ५ लाख नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. २० लाख नागरिकांना दुसरा डोस देण्याची गरज आहे. त्यासाठी या नागरिकांना लस देताना प्राधान्य दिली जाणार आहे.

मुंबईतील रुग्णालयात ऑक्सिजनचा जो साठा आहे तो मूल्यवान आहे. कधी कधी त्याचा जास्त वापर होतो. त्यामुळे आम्ही हॉस्पिटलला ऑक्सिजन जपून वापरायला सांगितलं आहे. महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन आणि आयसीयू कमी पडू नये असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी पालिकेच्या कूपर, नेसको, सेव्हन हिल्स मुलुंड आदी रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये आयसीयू बेड वाढवत आहोत, असे काकाणी यांनी सांगितले.

विविध राज्यात निवडणुकीसाठी गेलेल्यांची मुंबईत परतल्यावर तपासणी

देशात तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा,चेन्नई आदी राज्यात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामासाठी गेलेले आता मुंबईत विमानाने परतत आहेत. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. त्याचप्रमाणें, इतर प्रवाशांचीही स्क्रिनिंग केली जात आहे, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली.


हेही वाचा – ‘मुंबई आमची-सामान्य माणसांची’! मुंबईतील सामान्य माणसांसाठी मुंबईकरांचं अभियान

First Published on: May 3, 2021 7:45 PM
Exit mobile version