मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू, एकूण संख्या ८!

मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू, एकूण संख्या ८!

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईत कोरोनामुळे आज आणखी एका पोलिसाला आपला प्राण गमवावा लागला आहे. कोरोनाच्या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाउनच्या काळात कायदा, सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाही आता या विषाणूनं विळखा घातला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई दलात आठवा बळी गेला. शाहूनगर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे कोरोनामुळे आज पहाटे निधन झाले आहे.

शाहूनगर पोलीस ठाण्यातील  सहाय्यक पोलीस निरीक्षक ताप आणि सर्दी यामुळे आजारी होते. दरम्यान, त्यांनी सायन रुग्णालयात १३ मेला करोनाची चाचणी केली होती आणि त्याचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. मात्र, आजच पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते राहत्या घरी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना सायन रुग्णालय उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.

मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या आठवर पोहोचली आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात नाशिक, सोलापूर आणि पुणे मिळून तीन पोलिसांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात एकूण आकडा आता दहावर पोहोचला आहे. दरम्यान महाराष्ट्रात तब्बल १००१ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती गृहखात्याने दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्यापैकी ४४० रुग्ण हे मुंबई पोलिस दलातील आहेत. राज्य सरकारने याआधीच कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत करणार असल्याचे जाहीर आहे.


हे ही वाचा- राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज, पण मान्सून लांबणीवरच!


 

First Published on: May 16, 2020 12:25 PM
Exit mobile version