Corona Update – करोनाग्रस्तांना मिळणार आता विम्याचे कवच!

Corona Update – करोनाग्रस्तांना मिळणार आता विम्याचे कवच!

करोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. दरम्यान, करोना व्हायरस महाराष्ट्रात येऊन धडकला असून पुण्यातील करोनाग्रस्तांची संख्या पाच झाल्याची माहिती ताजी असतानाच मुंबईत देखील करोनाचे दोन रूग्ण आढळले आहेत. मात्र आता दिलासा देणारे गोष्ट म्हणजे करोनाग्रस्तांना विम्याचे कवच देण्याचे आदेश आयआयडीने दिले आहेत.

भारतीय विमा विकास प्राधिकरण या संस्थेने ४ मार्चला एक पत्र जारी केलं आहे. सध्या सरकारी रूग्णालयात करोनावर उपचार सुरू आहेत. पण भविष्यात खासगी रूग्णालयाची गरज करोना रूग्णांना पडू शकते. कारण संशयित रूग्ण जरी आढळला तरी त्याच्यावर उपचार केले जातात. करोना हा नव्याने व्हायरस पसरल्यामुळे त्याचा समावेश हा या आधी विम्यात करण्यात आला नव्हता. मात्र आता करोनाचा समावेश विम्यात करण्यात येणार आहे.

भारतीय विमा विकास प्राधिकरणने जारी केलेल्या पत्रात तसा उल्लेख करण्यात आला आहे की, करोनाशी संबंधीत कोणत्याही रूग्णाला, कोणत्याही उपचाराला विमा लागू होणार आहे. रूग्णाच्या औषधांचा खर्च मेडिक्लेमच्या कोणत्याही पॉलिसीमध्ये समावेश करावा असे स्पष्ट आदेश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत. सर्व खासगी कंपन्यांना ते बंदकारक असणार आहे.

मुंबईत करोनाचे २ रूग्ण

मुंबईत करोनाचे दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू होते. मुंबईत सुरू असलेल्या सहा रुग्णांपैकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं कस्तुरबा हॉस्पिटलच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेने स्पष्ट केलं आहे. दुबईहून प्रवास करून आलेले पुण्यातील दोन प्रवासी दोन दिवसांपूर्वी करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू असून या रुग्णांसोबत मुंबईतील दोन सहप्रवासी देखील करोना बाधित असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.


हे ही वाचा- करोना अपडेट – करोना मुंबईत शिरला; मुंबईत दोन रुग्ण पॉझिटिव्ह!


 

First Published on: March 11, 2020 8:24 PM
Exit mobile version