Corona Vaccination: मुंबईकरांचा लसीकरणाला प्रतिसाद, काल ६९ हजार ५७७ मुंबईकारांनी घेतली लस

Corona Vaccination: मुंबईकरांचा लसीकरणाला प्रतिसाद, काल ६९ हजार ५७७ मुंबईकारांनी घेतली लस

Corona Vaccination: मुंबईकरांचा लसीकरणाला प्रतिसाद, काल ६९ हजार ५७७ मुंबईकारांनी घेतली लस

मुंबईसह राज्यात लसीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. लसीच्या तुटवड्यामुळे मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र बंद करावी लागली. मात्र लसीच्या साठा मिळाल्यानंतर लसीकरण केंद्र पुन्हा सुरु करण्यात आली. मुंबईकरांनी लसीकरणाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. केवळ कालच्या दिवसात मुंबईत तब्बल ६९ हजार ५७७ मुंबईकरांनी लसीकरण केले गेले. आतापर्यंत मुंबईत एका दिवसाला झालेले सर्वात मोठे लसीकरण आहे. मुंबईत आतापर्यंत २२ लाख लोकांनी लसीकरण केले आहे. मात्र दिवसाला ६० हजारांहून अधिक लसीकरण मुंबईत पहिल्यांदाच करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेनेही या गोष्टीचे कौतुक केले आहे.


याविषयी मुंबई महापालिकेने ट्विट केले आहे, त्यात असे म्हटले आहे की, काल मुंबईत ६९ हजार ५७७ जणांनी लस घेतली. आपण हेच ध्येय पुढे ठेवूयात. पात्र आणि नोंदणीकृत असलेल्यांनी लस घ्या. त्याचबरोबर लसीकरण केंद्रावर वेळेपूर्वी गर्दी करु नका, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लसीचा साठा जसा उपलब्ध असेल त्याप्रमाणे लसीकरण केंद्र खुली करण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे.

१ मे पासून राज्यात १८ वर्षांवरील तरुणांना कोरोना लस दिली जाणार आहे. लसीबाबत जनजागृती करण्यासाठी त्याचबरोबर मोठ्या संख्येने लसीकरण करुन कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई महापालिकेने #Vaccinated ही योजना राबवली आहे. लस घेतल्यानंतरचा क्षण आमच्यासोबत साजरा करा असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सेल्फी झोनसाठीही पालिकेने पुढाकार घेतला आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: लस घ्या अन् म्हणा #Vaccinated, सेल्फी झोनसाठी BMC चा पुढाकार

First Published on: April 27, 2021 11:23 AM
Exit mobile version