Corona vaccine : मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवलीत आज लसीकरण बंद, पालिका, सरकारी केंद्रांवर लसचं नाहीत

Corona vaccine : मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवलीत आज लसीकरण बंद, पालिका, सरकारी केंद्रांवर लसचं नाहीत

Corona vaccine :

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून केंद्राकडून लसींचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याने मुंबईतील लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. मर्यादित लसींच्या साठ्यामुळे गुरुवारी मुंबईत केवळ ४५ हजार नागरिकांनाच लस देण्यात आली. मात्र आज मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवलीसह अनेक भागांतील लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहिम पूर्णपणे ठप्प झाली आहे. लसीकरण केंद्रांवर नागरिकांना सकाळपासूनचं गर्दी करण्यास सुरुवात केली. मात्र केंद्राबाहेरील लस उपलब्ध नसल्याचे फलक पाहून नागरिकांना डोस न घेताच घरी परतावे लागले. त्यामुळे मुंबई, मुंबई उपनगर, कल्याण- डोंबिवली अंबरनाथ आणि बदलापूर शहरात लस उपलब्ध होईपर्यंत लसीकरण मोहिम बंद राहणार आहे. अनेक लसीकरण केंद्रांवर नियमितपणे लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळे येत आहेत.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आत्तापर्यंत ५९ लाख २९ हजार १९० नागरिकांना लस देण्यात आली. जूनच्या शेवट्याच्या आठवड्यापर्यंत लसींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने लसीकरण मोहिमेने वेग धरला होता. दररोज सरासरी १ लाख नागरिकांना लस देण्यात येत होती. मात्र आठवड्याभरापासून केंद्राकडून अपेक्षित लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने लसीकरण मोहीम थंडावली आहे. यात गुरुवारी मोजक्याच पालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध होत्या. मात्र आज बऱ्याच लसीकरण केंद्रावर लसचं उपलब्ध नसल्याने नागरिकांना घरी परतावे लागले.


‘आधी वसुली बार मालकांकडून… आता वसुली व्यापाऱ्यांकडून’, संदीप देशपांडेंची राज्य सरकारवर गंभीर टीका


 

First Published on: July 9, 2021 12:26 PM
Exit mobile version