GoodNews! मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या Zycov-D vaccine ची यशस्वी चाचणी सुरू

GoodNews! मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या Zycov-D vaccine ची यशस्वी चाचणी सुरू

Zycov-D vaccine

देशात कोरोनाचा संसर्ग गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रण आणण्यासाठी देशभर कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या लसीकरण मोहीमेत नागरिकांना कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक लसींचा डोस दिला जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे झायडसने बनविलेल्या झायकोव्ह-डी (Zycov-D vaccine) लसीची चाचणी देशभरात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात जे. जे. समूहाच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात झायकोव्ह-डी लसीची चाचणी सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लसीच्या चाचणीसाठी २,७३७ लोकांची निवड

मिळालेल्या माहितीनुसार, या चाचणीसाठी रुग्णालयाने २ हजार ७३७ लोकांची निवड केली. या सर्व लोकांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. लस दिल्यानंतर पाच महिन्यांनंतर केवळ २२ लोकांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचे समोर आले. मात्र, आजपर्यंत कोणतेही गंभीर दुष्परिणाम झाल्याचे दिसून आले नाहीत आणि ही लस घेतल्यानंतर संक्रमित झालेल्या व्यक्तींमध्ये फक्त सौम्य आणि मध्यम लक्षणे असल्याचे आढळून आले आहे.

ही सुईशिवाय घ्यावी लागणारी लस

असे सांगितले जातेय की,कोरोना विरूद्ध लढा देणारी झायकोव्ह-डी ही एक सुईशिवाय घ्यावी लागणारी लस आहे. ही इंट्रा-डर्मल लस आहे, ज्यास स्नायूंमध्ये इंजेक्शनची लावण्याची आवश्यकता नसते. या लसीचे तीन डोस घ्यावे लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर, दुसरा २८ व्या दिवशी आणि तिसरा ५२ व्या दिवशी घ्यावा लागतो. एकावेळी दोन्ही हातांना ०.२ मिली एवढ्या प्रमाणात लस दिली जात असल्याचे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले.


India Corona Update: गेल्या २४ तासांत बाधितांसह मृतांमध्ये घट; ३५ हजारांहून अधिकांची कोरोनावर मात
First Published on: July 26, 2021 11:31 AM
Exit mobile version