एसआरएची मॉन्सुनपूर्व कामे करण्यासाठी मंजूरी

एसआरएची मॉन्सुनपूर्व कामे करण्यासाठी मंजूरी

मॉन्सुन पूर्व नियोजनासाठी झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणाने आज एक परिपत्रक जारी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घ्यायची याबाबतचे मार्गदर्शन या परिपत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. एसआरएसाठी विकासकांनी प्रतिबंधात्मक तसेच नियोजनबद्ध काय कामे करायची यासाठीचा खुलासा परिपत्रकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

एसआरएच्या विकासकांकडून पुर्नविकासासाठी हाती घेण्यात आलेल्या इमारतींमध्ये अपूर्ण राहिलेली इमारतीच्या पायाचे बांधकाम किंवा ज्यामुळे मॉन्सुनच्या कालावधीत पाणी साचेल अशी कामे पूर्ण करून घेण्यासाठी या परिपत्रकातून सूचना देण्यात आल्या आहेत. मॉन्सुनपूर्व कामामध्ये सर्व मार्गदर्शकांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच मॉन्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असेल असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मॉन्सुनपूर्व कामासाठी वास्तुविशारद किंवा परवानाधारक सर्वेक्षणकर्त्यांमार्फत कार्यकारी अभियंत्यांच्या नावे अर्ज करावे लागतील. कार्यकारी अभियंत्यांचे ईमेल आयडी हे एसआरएच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ही सर्व मॉन्सूनपूर्व कामे करण्यासाठी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परवानगी दिली आहेत. तसेच कोविड-१९ च्या मार्गदर्शकांची अंमलबजावणी करूनच ही कामे करावीत असे स्पष्ट करण्यात आले आहेत. कार्यकारी अभियंत्यांच्या मंजुरीनेच ही कामे करावी लागतील असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.


हेही वाचा – CoronaVirus: वायू प्रदूषणाच्या कणांवर आढळले कोरोना विषाणू!


 

First Published on: April 27, 2020 4:04 PM
Exit mobile version