CoronaVirus: आता घरोघरी जाऊन करोना चाचणी करणार!

CoronaVirus: आता घरोघरी जाऊन करोना चाचणी करणार!

राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महापालिका आता घरोघरी जाऊन करोनाची चाचणी सुरू करणार आहे. यासाठी पालिकचे नवीन दूरध्वनी क्रमांक देखील सुरू होत आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये ही सुविधा सुरू करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच आयसीएमआरने मान्यता दिलेल्या लॅबमध्ये ज्या प्रवाशांना घरी क्वारंटाईन करण्यात आलं आहे आणि ज्यांना त्रास होत आहे त्यांच्यासाठी येथे करोना चाचणी करणे उपलब्ध आहे.

पालिकेचा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित झाल्यानंतर डॉक्टर हेल्पलाइनवर रुग्णांची संपूर्ण माहिती घेतली आणि गरज भासल्यास करोना चाचणी करण्याचा सल्ला देतील. तसंच घरी येऊन चाचणी नमुना घेणे आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मान्यता दिलेल्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविणे यासाठी समन्वय करून देतील.

देशात २४ करोना रुग्ण रिकव्हर 

सध्या करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारची परवानगी मिळाली तर लवकरच वैद्यकीय महाविद्यालयात करोना चाचणी केंद्र सुरू करण्याच येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होत. आतापर्यंत देशात ४९९ करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला असून २४ करोना रुग्ण रिकव्हर झाले आहेत. तसंच देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात करोनाग्रस्तांची ९७वर पोहोचली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे.


हेही वाचा – CoronaVirus: करोनामुळे संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे संकट – आयएमएफ


 

First Published on: March 24, 2020 8:43 AM
Exit mobile version