Coronavirus : आर्थर रोड तुरुंगात कोरोनाचा शिरकाव ; २७ कैद्यांना कोरोनाची लागण

Coronavirus : आर्थर रोड तुरुंगात कोरोनाचा शिरकाव ; २७ कैद्यांना कोरोनाची लागण

Coronavirus : आर्थर रोड तुरुंगात कोरोनाचा शिरकाव ; २७ कैद्यांना कोरोनाची लागण

मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने शिरकाव केला आहे. मागील काही दिवसांत 27 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या कैद्यांना भायखळा येथील एका महानगरपालिकेच्या शाळेत विलगिकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती आर्थर रोड तुरुंगाचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिली.वायचळ यांच्या म्हणण्यानुसार, बाहेरून येणारे नवीन कैदी आणि न्यायबंदी यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. आर्थर रोड तुरुंगात असलेल्या जुन्या कैद्यामध्ये केवळ 4 कैद्यांना कोरोनाची लागण झालेली असून इतर रुग्ण कैदी हे बाहेरून आलेले असल्यामुळे त्यांना भायखळा येथील मनपाच्या शाळेत विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तुरुंगातील कैद्यांची पूर्णपणे काळजी घेतली जात असून, अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्या कैद्यांना तुरुंगातील एका बॅरेकमध्ये विलगिकरण कक्षात ठेवण्यात येत असल्याचे वायचळ यांनी सांगितले.

देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

भारतात कोरोना रुग्णसंख्येत सोमवारच्या तुलनेत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंटबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,68,063 नवीन रुग्ण आढळले आहेत. मात्र आजच्या रुग्णसंख्येमुळे थोडा दिलासा मिळाला आहे. कारण सोमवारच्या तुलनेत आज 6.5 टक्के कमी रुग्ण नोंदवण्यात आले. तर कोरोनामुळे गेल्या चोवीस तासात 277 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 69,956 रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. यात सोमवारी देशात 1.79 लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यामुळे भारतात आतापर्यंत कोरोनाचे 3,58,75,790 रुग्ण आढळले आहेत. तर देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 4,461 वर पोहोचली आहेत.


हे ही वाचा – coronavirus : …तर कोरोना रुग्णाच्या संपर्कातील लोकांची चाचणी करण्याची गरज नाही- ICMR


 

First Published on: January 11, 2022 2:51 PM
Exit mobile version