Lockdown – कोरोनाच्या भितीमुळे १६०० किमी चालत आलेल्या मुलाला आईनं घराबाहेरच ठेवलं!!

Lockdown – कोरोनाच्या भितीमुळे १६०० किमी चालत आलेल्या मुलाला आईनं घराबाहेरच ठेवलं!!

कोरोना परिणाम माणसाच्या नात्यावरही झाल्याचं दिसून येत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सगळे सध्या घरातच बसून आहेत. मात्र हातावर पोट असणाऱ्यांनी मात्र गावची वाट धरली आहे. लॉकडाऊन जाहीर होताच लोक गावंकडे चालत निघाली. अशाच एका तरूणाने मुंबईतून वाराणसीला जाण्याचा निर्णय घेतला. पण गावी जाऊन त्याची निराशाच झाली. कारण गावी त्याला घरातच घेतलं नाही.

मुंबईतील नागपाडा भागात काम करत होता. तो लॉकडाउनमुळे वाराणसीला जाण्यास निघाला. १४ दिवसांपूर्वीच तो त्याच्या सहा मित्रांसोबत निघाला. रस्त्यावरुन आणि रेल्वे ट्रॅकरुन चालत तो अखेर वाराणसीला पोहचला. यावेळी त्याच्या खिशात काही पैसे होते मात्र ते वाचवत तो वाराणसीत पोहचला. मात्र गावी पोहचल्यावर काही भलतच त्याच्या पुढ्यात वाढून ठेवलं होतं. घरी पोहचल्यावर त्याच्या आईने त्याला घरातच घेतले नाही. घराचा दरवाजाही उघडला नाही. तसंच त्याच्या भावाने आणि वहिनीनेही घराचा दरवाजा उघडला नाही.

या मुलाला कोरोना झाला आहे अशा समजूतीने या दोघींनी दार उघडले नाही. खरतर त्याची तपासणी झाली होती. त्याला १४ दिवस क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र तो चालत वाराणसीला गेला. यावेळी त्याच्या सोबत त्याचा मित्रही होता. सध्या या तरूणाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या तरुणाला किंवा त्याच्यासोब आलेल्या तरुणांना करोनाची लागण झाली असेल असं गावकऱ्यांना वाटतं आहे. आम्ही या तरुणाला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेलो तिथे या तरुणाची तपासणी केली. त्यानंतर आम्ही त्याला त्याच्या घरी घेऊन गेलो मात्र घरातल्यांनी त्याला घरात घेण्यास नकार दिला. अशी माहिती कोतवाली ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी दिली.


हे ही वाचा – लॉकडाऊनमध्ये बायकोपासून वाचण्यासाठी जाऊन बसला गाडीत…पण झालं भलतचं!


 

First Published on: April 13, 2020 7:16 PM
Exit mobile version