वसईत कोरोनाने घेतला पहिला बळी

वसईत कोरोनाने घेतला पहिला बळी

आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयाचा ठेकेदार बदला सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत यांची मागणी

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने वसईत पहिला बळी घेतला आहे. एका ६४ वर्षीय व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या व्यक्तीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी जाहीर झाले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, ही व्यक्ती कोणताही परदेशी दौरा करुन आलेली नव्हती. मात्र, या व्यक्तीला कोरोनाची लागण कशी झाली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच याबाबत शोध देखील सुरु आहे. त्याचप्रमाणे ही व्यक्ती राहत असलेला सदरचा परिसर सील करण्यात आला असून त्यांच्या घरातल्यांना देखील अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. परदेशी प्रवासाची पार्श्वभूमी नसलेला आणि कोरोनाची लागण झालेला हा वसईतील पहिला रुग्ण आहे. तर वसईत कोरोनाचे एकूण ९ रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्तांची संख्या थेट ४१६ वर 

तर आत्तापर्यंत ४२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.


हेही वाचा – गो कोरोना, कोरोना गो!, म्हणणारे आठवले आता म्हणतात…


 

First Published on: April 2, 2020 11:19 PM
Exit mobile version