घरCORONA UPDATEगो कोरोना, कोरोना गो!, म्हणणारे आठवले आता म्हणतात...

गो कोरोना, कोरोना गो!, म्हणणारे आठवले आता म्हणतात…

Subscribe

गो करोना, करोना गो! या घोषणेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एक नवीन घोषणा केली आहे.

‘गो कोरोना, कोरोना गो!’, या आगळ्या वेगळ्या घोषणेमुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले चांगलेच चर्चेत आले. त्यांच्या या घोषणेवर अनेकांनी व्हिडिओ तयार करुन गो कोरोनाचा नारा देखील दिला. मात्र, आता गो कोरोना, कोरोना गो! या घोषणेनंतर त्यांनी एक नवीन घोषणा केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी ती नवी घोषणा केली.

ही आहे आठवलेंची नवी घोषणा

- Advertisement -

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाला रामदास आठवले यांनी गो कोरोना, कोरोना गो!, असे म्हटले होते. मात्र, आता त्यांनी गो कोरोनानंतर नो कोरोना, नो कोरोना, असे म्हटले आहे. त्यामुळे आता नो कोरोनामुळे पुन्हा एकदा रामदास आठवले चर्चेत येण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले आठवले?

- Advertisement -

‘२० फेब्रुवारीला मी चीनच्या अँबेसेडर यांच्यासोबत एका कार्यक्रमात गेलो होतो. त्यावेळी चीनमध्ये कोरोना आला होता. त्यामुळे मला त्याठिकाणी ही घोषणा आठवली आणि मी बोलो. कारण मुळात माझे नावच आठवले आहे. त्यामुळे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ही घोषणा केली. जी घोषणा जगभरात प्रसिद्ध झाली आहे. मात्र, आता मी नो कोरोना, नो कोरोना, असे म्हणत आहे. परंतु, कोरोना हा महामारी आहे. त्याला आपण जा म्हटल्यावर तो जाणार नाही हे मलाही माहित आहे. पण, मला सुचले म्हणून मी बोलो’.

आठवलेंचे छंद

‘सध्या मी घरातच राहत आहे. कोरोना आपल्यापर्यंत पोहचू द्यायचा नसेल तर तुम्ही देखील घरातच थांबा आणि काळजी घ्या’, असे मला वाटते. ‘घरात बसा आणि आपले छंद जोपासा सध्या मी घरात बसून कविता लिहितो. पुस्तक वाचतो. कॅरम खेळतो. गिटार वाजवण्याचा प्रयत्न करतो. त्यासोबतच राज्यातील विविध लोकांशी रोज संवाद साधतो. यासोबतच मी घरात बसून काय काय करायचे याची नियमावली तयार केली आहे. त्याप्रमाणे ती प्रत्येकाने आखावी आणि कोरोनापासून आपला बचाव कराव’, असे देखील ते म्हणाले.


हेही वाचा – रुग्णालयाच्या चुकीमुळे तीन दिवसाच्या बाळासह आईला कोरोना; रुग्णालय केले सील


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -