Crime News : भांडणात मध्यस्थी केल्याने लहान भावाकडून भावावरच हल्ला; ट्रॉम्बेतील धक्कादायक घटना

Crime News : भांडणात मध्यस्थी केल्याने लहान भावाकडून भावावरच हल्ला; ट्रॉम्बेतील धक्कादायक घटना

मुंबई : ट्रॉम्बे येथे मोठ्या भावावर लहान भावाने चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यात अरबाज रेहमतअली खान हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर शीव हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेला लहान भाऊ सेहबाज रेहमत अली खान याच्याविरुद्ध ट्रॉम्बे पोलिासांनी गुन्हा दाखल केला आहे. (Crime News Younger brother attacked brother for mediating quarrel in Trombay)

मिळालेल्या माहितीनुसार, खान कुटुंबिय ट्रॉम्बे येथे राहतात. अरबाज हा मॅनेजमेंटचे काम करतो तर त्याचा लहान भाऊ सेहबाज हा काहीच काम करत नाही. दोन दिवसांपूर्वी सेहबाजने एका लहान मुलाशी भांडण झाले होते. त्यामुळे अरबाजने त्यांच्या भांडणात मध्यस्थी करुन दोघांमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – Crime News : न्यूझीलंड टूर पॅकेजसाठी दिलेल्या पैशांचा अपहार; वृद्धेची फसवणूक, आरोपीला अटक

काही वेळानंतर अरबाजने त्याला घरी नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अरबाजने मध्यस्थी केल्याचा त्याच्या मनात राग होता. त्यातून रागाच्या भरात त्याने त्याने अरबाजवर चाकूने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला आधी शताब्दी आणि नंतर शीव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

ही माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अरबाजची पोलिसांनी जबानी नोंदवून त्याचा लहान भाऊ सेहबाज खानविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर सेहबाज पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

कार लोन घेऊन बँकेची 45 लाखांची फसवणूक

दरम्यान, बोगस दस्तावेज सादर करुन कार लोन घेऊन एका नामांकित बँकेची सुमारे ४५ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी एकाला अटक केली. इम्रान मेहरह दिनखान हुसैन खान असे आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यांत इतर चार ते पाचजणांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.


हेही वाचा – Crime News : कार लोन घेऊन बँकेची 45 लाखांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक

First Published on: April 13, 2024 9:34 PM
Exit mobile version