Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमCrime News : न्यूझीलंड टूर पॅकेजसाठी दिलेल्या पैशांचा अपहार; वृद्धेची फसवणूक, आरोपीला...

Crime News : न्यूझीलंड टूर पॅकेजसाठी दिलेल्या पैशांचा अपहार; वृद्धेची फसवणूक, आरोपीला अटक

Subscribe

न्यूझीलंड टूर पॅकेजसाठी दिलेल्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी एका टुर्स मालकाला दहिसर पोलिसांनी अटक केली. तेजस महेंद्र शाह असे या टुर्स मालकाचे नाव आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

मुंबई : न्यूझीलंड टूर पॅकेजसाठी दिलेल्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी एका टुर्स मालकाला दहिसर पोलिसांनी अटक केली. तेजस महेंद्र शाह असे या टुर्स मालकाचे नाव आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत बोरिवली येथे राहते. एका खाजगी बँकेतून निवृत्त झालेल्या या महिलेला तिच्या पतीसोबत विदेशात फिरायला जायचे होते. याच दरम्यान तिला एका गुजराती वर्तमानपत्रात पूर्वा हॉलिडेज कंपनीची एक जाहिरात दिसली होती. (Crime News Embezzlement of money paid for New Zealand tour package Fraud of old woman accused arrested)

या कंपनीने न्यूझीलंडसाठी एक आकर्षक टूर पॅकेजची जाहिरात केली होती. त्यामुळे तिने कंपनीच्या कार्यालयात जाऊन सविस्तर चर्चा करुन पूर्वा हॉलिडेजचे मालक तेजस शाह यांना तिच्यासह तिच्या पतीसाठी न्यूझीलंड टूर पॅकेजसाठी ८ लाख ३३ हजार रुपये जमा केले होते. काही दिवसांनी त्यांचा व्हिसा आला.

- Advertisement -

हेही वाचा – Sydney Terror Attack : ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मॉलवर दहशतवादी हल्ला, अनेकांचा मृत्यू

मात्र कंपनीकडून त्यांच्या न्यूझीलंडचे तिकिट काढण्यात आले नव्हते. वारंवार विचारणा करुन तेजस शाह यांना त्यांचे रिटर्न तिकिट पाठविले नव्हते. सतत विचारणा केल्यानंतर तेजसने १ जानेवारी २०२४ पर्यंत तिकिट बुक झाले नाहीतर त्यांचे संपूर्ण पेमेंट परत करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिकिट बुक केले नाही. त्यामुळे तिने तेजस शाहकडे टूर पॅकेजसाठी दिलेल्या ८ लाख ३३ हजाराची मागणी केली होती.

- Advertisement -

६ जानेवारीला त्याने त्यांना आठ लाख तीन हजार रुपयांचा एक चेक दिला होता. मात्र हा चेक दोन वेळा बँकेत डिपॉझिट करुनह बाऊन्स झाला होता. त्यानंतर त्याने त्यांच्या बँक खात्यात दिड लाख रुपये ट्रान्स्फर केले. मात्र उर्वरित ६ लाख ८३ हजाराचा अपहार करुन वयोवृद्ध जोडप्याची फसवणुक केली होती. या घटनेनंतर तिने दहिसर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तेजसविरुद्ध तक्रार केली होती. गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला दोन दिवसांपर्वूी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा – Woman Killed Unilateral Lover : मित्राच्या साथीने प्रेयसीने काढला प्रियकराचा काटा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -