एपीएमसी मार्केटमध्ये १ हजार गाड्या दाखल; नागरिकांची तुफान गर्दी

एपीएमसी मार्केटमध्ये १ हजार गाड्या दाखल; नागरिकांची तुफान गर्दी

एपीएमसी मार्केट

देशात करोनापासून मुक्तता मिळवण्यसाठी लॉकडउन जाहीर केले आहे. तर दुसरीकडे करोग्रस्त रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज महाराष्ट्रात करोनाचे सहा रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात करोनाचा आकडा १७७ वर गेला आहे. तर दुसरीकडे नागरिकांची भाजी खरेदीकरता तुफान गर्दी दिसून येत आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये १ हजार १०० गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. गर्दी करु नका, असे सांगून देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या दाखल झाल्याने नियोजन करणे कठीण असले तरी आज मार्केटमध्ये टप्प्याटप्प्याने गाड्या मार्केटमध्ये दाखल केला जात आहेत. गाड्यांवर जंतूनशकांची फवारणी केली जात आहे. तर ग्राहकांना वेगळ्या गेटने आत सोडण्यात येत असले तरी सोशल डिस्टन्स पाळण्यात येत नाही. बाजार समितीमध्ये फक्त होलसेल ग्राहकांना प्रवेश देण्यात येत आहेत. तरी होलसेलमध्ये स्वस्त भाजी मिळत असल्याने घरगुती ग्राहक देखील गर्दी करताना दिसत आहेत. मार्केटमध्ये माथाडी, व्यापारी, ग्राहक यांची गर्दी कायम असून याबाबत अजून कडक नियम अवलंबताना मार्केट परिसरात दिसून येत नाही. परंतु शुक्रवारपेक्षा आज गाड्या निर्जंतुकीकरण करून आणि ग्राहकांना हात धुवून पाठवण्यात येत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजीपाला व्यापारी संचालक शंकर पिंगळे यांनी दिली आहे.


हेही वाचा  – महाराष्ट्राची चिंता वाढली; ६ नवे करोनाग्रस्त रुग्ण; संख्या १७७ वर


 

First Published on: March 28, 2020 12:39 PM
Exit mobile version