Aryan Khan drugs case: आर्यन खानच्या बेलसाठी राम कदम यांचं देवाकडे साकडं

Aryan Khan drugs case: आर्यन खानच्या बेलसाठी राम कदम यांचं देवाकडे साकडं

Aryan Khan drugs case: आर्यन खानच्या बेलसाठी राम कदम यांचं देवाकडे साकडं

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. आर्यन खानसह इतर दोन आरोपींच्या जामिनावर देखील आज सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी भाजपचे आमदार राम कदम यांनी आर्यनला जामीन मिळण्यासाठी प्रार्थना करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राम कदम म्हणाले की, ‘जामीन मिळवणे हा संविधान आणि कायद्यानुसार मुलभूत अधिकार आहे. अपेक्षा होती महाराष्ट्र सरकार निदान ह्या खतरनाक ड्रग्स प्रकरणात ड्रग्समाफियाच्या विरोधात उभे राहतील, मात्र वसूलीचा प्रभाव स्पष्ट दिसला.’

भाजप आमदार राम कदम यांनी ट्वीट करत आर्यन खानच्या जामिनासाठी प्रार्थना केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘प्रार्थना आहे की, आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान अन् कायद्याप्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे. ही लढाई कोणा एक व्यक्ति विशेषच्या विरोधातील लढाई नाही तर अखंड मानव जातीची ड्रग्स विरोधी लढाई आहे. अपेक्षा होती महाराष्ट्र सरकार निदान ह्या खतरनाक ड्रग्स प्रकरणात ड्रग्समाफियाच्या विरोधात उभे राहतील, मात्र वसूलीचा प्रभाव स्पष्ट दिसला. महबूबामुफ्ती यांनी देखील याचा आगामी निवडणुकीसाठी याचा पुरेपूर उपयोग केला. जी ड्रग्सची नशा आपल्या सर्व युवकांना बरबाद करू शकते त्या विरोधात सर्व पक्ष आणि मानव जात एकत्र का येऊ शकत नाहीत. हे दुःख आहे.’

पुढे राम कदम म्हणाले की, ‘आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत गरीब, नेता, अभिनेता असो कायद्याच्या समोर सर्वे समान आहेत. भविष्यात आर्यनने ज्या ड्रग्सचा कलंक त्याच्या बदनामीचे कारण झाले. त्याने ड्रग्सच्या विरोधात प्रखर लढाई उभी करून युवकांना ड्रग्सपासून दूर करण्यासाठी काम करून संकटाचे संधीत रूपांतर करण्यासाठी एक देशवासि या नात्याने शुभेच्छा.’


हेही वाचा – मोठी कारवाई! सायनमधून २१ कोटींची हेरॉईन जप्त; एक महिला ड्रग्ज पेडलर गजाआड


 

First Published on: October 20, 2021 11:24 AM
Exit mobile version