क्रिस्टल टॉवर आग प्रकरण; आरोपी बिल्डरला दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी

क्रिस्टल टॉवर आग प्रकरण; आरोपी बिल्डरला दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी

परळच्या क्रिस्टल टॉवर आग प्रकरणी आरोपी बिल्डरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज भोईवाडा कोर्टामध्ये आरोपी बिल्डर अब्दुल रज्जाक इस्माईल सुपारीवालाला हजर करण्यात आले होते. भोईवाडा कोर्टाने आरोपी बिल्डरला दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. क्रिस्टल टॉवर आग प्रकरणात ४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. तर २३ जण जखमी झाले होते.

अशी घडली होती घटना 

क्रिस्टल टॉवर या १६ मजली इमारतीच्या १२ व्या मजल्याला बुधवारी सकाळी आठच्या सुमारास आग लागली होती. या आगीच्या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत. १२ व्या मजल्यावर लागलेली आग वरच्या मजल्यावर पोहचल्याने अनेकांच्या घराचे नुकसान झाले आहे. आग विझवताना अग्निशमन दलाकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. या पाण्यामुळेही खालील मजल्यावरील रहिवाशांचे सामान भिजून त्याची नासधूस झाली. तर आग विझवताना अग्निशमन दलाचे ५ जवान देखील जखमी झाले होते.

First Published on: August 30, 2018 4:06 PM
Exit mobile version