वडापावच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट, ११ जण जखमी, दुकान मालकाचा मृत्यू

वडापावच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट, ११ जण जखमी, दुकान मालकाचा मृत्यू

उल्हासनगर येथे वडा पावच्या दुकानात स्फोट

उल्हासनगर कॅम्प ४ मधील पारस डेअरी जवळ असलेल्या जय माता दी वडापाव सेंटरमध्ये दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागून सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत भाजल्यामुळे दुकान मालकाचा मृत्यू होऊन ११ जण जखमी झाले आहेत. उल्हासनगर कॅम्प ४ मधील सेक्शन २५ परिसरातील पारस डेअरी जवळ असलेल्या जय माता दी वडापाव सेंटर आहे. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग लागली. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर नऊ जण किरकोळ जखमी झाले आहेत. दुकानाचा मालक रविंद्र उर्फ पप्पू गुप्ता याचा मध्यवर्ती रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला.

स्फोटामुळे लागलेली आग इतकी भीषण होती की, दुकानदार आणि कामगारांनी आग लागताच दुकानातून पळ काढला. शेजाऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु केले. याची माहिती स्थानिक रहिवाश्यांनी उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलही तात्काळ घटनास्थळी पोहचत आगीवर नियंत्रण आणले.

या आगीमुळे दिनेश गुप्ता, मनोज जैस्वाल, काशी गुप्ता, लक्ष्मण, दुलारी, आशिष, राजकुमार प्रजा्पती, मनोज सोनकर, दिनेश बाजीगर, सुनील चेतन, विजय भाटिया, हरिसिंग राजपूत, सुरेश आहुजा, प्रकाश केसवानी असे ११ लोक जखमी झाले आहेत. यापैकी दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर शिवनेरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

First Published on: August 8, 2020 6:53 PM
Exit mobile version