डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी,डबेवाल्यांची राज्य सरकारकडे मागणी

डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी,डबेवाल्यांची राज्य सरकारकडे मागणी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनात सहभागी होत असल्याने कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात न जाण्याचा निर्णय घेतल्याचं मुंबईचा डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितलं.

कोरोना व्हायरसचे संकट देशावर अद्याप कायम आहे. अशातच फेब्रुवारी २०२१ मध्ये पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. जवळपास अडीच महिन्यांचा लॉकडाऊनमुळे राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवला जात आहे.याच सांधर्भात राजी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. राज्यातील अनेक भागांतील निर्बंध शिथिल करत पुन्हा अनलॉकची घोषणा झाली. यामुळे व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र राज्य सरकारने सरसकट लॉकडाऊन न उठवता ५ टप्प्यामध्ये अनलॉक करण्यासाठी नियमावली आखली आहे. योग्य खबरदरी घेत निर्बंध लागू करत सरकारने काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले आहेत. अशातच सामान्य नागरिकांसाठी अद्याप लोकलसेवा सुरू करण्यात आली नाहीये. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात लोकल सेवेविना लोकांची प्रवास करण्याची परवड होत असते.

अशातच मुंबईची ओळख असणार्‍या डबेवाल्यांना देखील याचा सामना करावा लागत आहे. यामुळे डबेवाल्यांनसाठी हि निर्बंध कमी करा !अशी मागणी डबेवाल्यांनी सरकारकडे केली आहे डबेवाल्यांना सुद्धा डबे पोहचवण्याची सेवा सुरळीतरित्या देतां यावी यासाठी लोकलने प्रवास करू देण्यास परवानगी मिळावी तसेच
बोरीवली- कांदिवली येथुन मंत्रालयात डबा पोहचवायचा असेल तर सायकल ने डबा पोहचवणे शक्य नाही अश्या अनेक अडचणी डबेवाल्यांनी मांडल्या आहेत. लोकलने प्रवास केल्या वर ही सेवा देणे सहज शक्य आहे. अश्या मागण्या समस्त मुंबईतीत डबेवाल्यांनी केल्या आहेत. तेव्हा डबेवाल्यांना ही लोकलने प्रवास करू देण्याची सवलत मिळावी तसेच ५०% चा नियम आम्हाला ही लावा,पण परवानगी द्या अशी विनंती करत डबेवाल्यांनी आपल्या समस्या सरकार पुढे मांडल्या आहेत.


हे हि वाचा – Maharashtra unlock : राज्यात अनलॉकला सुरुवात, तुमच्या जिल्ह्यात काय राहिल सुरु आणि काय बंद?

First Published on: June 7, 2021 11:01 AM
Exit mobile version