मृत मुलगी जन्मली; आईने शौचालयातच दिले सोडून

मृत मुलगी जन्मली; आईने शौचालयातच दिले सोडून

मृत मुलगी जन्मली; आईने शौचालयातच दिले सोडून

मुंबईच्या अंबोली परिसरातील एका महिलेने शौचालयात मुलीला जन्म दिला. परंतु, जन्मलेली मुलगी मृत असल्याचे समजताच तिने ते मृत बाळ तिथेच सोडून दिले आणि घरी निघून गेली. या महिलेचे नाव सुप्रिया सुर्यकांत कानेकर असे आहे. ही महिला १९ वर्षीय आहे. अभर्कांचे मृतदेह सापडलेल्या घटना देशात वारंवार घडत आहे. याअगोदरही कलकत्त्याच्या हरिदेवपूर परिसरात बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी तब्बल १४ नवजात अर्भकांचे मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आले होते. आता मुंबईमधील अंबोली परिसरातील सार्वजनिक शौचालयात एका अर्भकाचा मृतदेह आढळला आहे. याप्रकरणी स्थानिकांनी परिसरातील गर्भवती महिलांची माहिती काढली असता, पोलिसांना मृत अर्भकाची आई सापडली आहे. पोलिसांनी या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – १४ नवजात अर्भकांचे मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले सापडले

नेमकं काय आहे प्रकरण?

सुप्रिया कानेकर सोमवारी सार्वजनिक शौचलयात गेल्या असता, त्यांनी मुलीला जन्म दिला. परंतु, जन्माला आलेली मुलगी मृत असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. ही बाब कुणाला माहित पडू नये म्हणून शौचालयातच या मृत मुलीची व्हिलेव्हाट लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळी कुणीतरी आल्याची चाहूल त्यांना झाली. त्यामुळे या महिलेने थेट घर गाठले. शौचालयात मृत बाळ बघितल्यावर परिसरातील स्थानिकांनी पोलिस स्थानकत तक्रार दाखल केली. त्याचबरोबर मृत अर्भक शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. स्थानिकांनी गर्भवती महिलांची माहिती काढली. त्यामार्फत पोलीस कानेकरपर्यंत पोहोचले. कानेकरने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी या महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली. सध्या कानेकर रुग्नालयात दाखल असून ती बरी झाल्यावर तिच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती अंबोली पोलीस ठाण्याचे वपोनी भरत गायकवाड यांनी दिली आहे.


हेही वाचा – पिशवीमध्ये अर्भक ठेऊन ‘ति’ने गाठलं पोलीस स्टेशन!

First Published on: December 6, 2018 2:00 PM
Exit mobile version