दुर्दैवी घटना! गॅरेजच्या रॅम्पमधील पाण्यात बुडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

दुर्दैवी घटना! गॅरेजच्या रॅम्पमधील पाण्यात बुडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

विरारमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका ३ वर्षाच्या चिमुरडीचा गॅरेजच्या रॅम्पमधील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आराध्या असे या चिमुकलीचे नाव असून गॅरेजवर असलेल्या सुरक्षारक्षकाची ही नात होती.

नेमके काय घडले?

विरारमधील पूर्व कणेर राईपाडा परिसरात बिपीन राऊत यांचे सिद्धेश नावाचे गॅरेज आहे. याच गॅरेजमध्ये काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांची तीन वर्षांची आराध्या ही नात सायंकाळच्या वेळी परिसरात खेळत होती. खेळत असताना ती गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्याजवळ पोहोचली. रॅम्पमध्ये पाणी पाहून ती खेळण्यासाठी पाण्यात उतरली. पण, पाणी तिच्या उंचीपेक्षा जास्त खोल असल्याने त्यात बुडून तिचा मृत्यू झाला.

आराध्या खेळत असताना सुरक्षारक्षक तिचे आजोबा आणि कुटुंबीय त्यांच्या घरात झोपलेले होते. तसेच पावसामुळे या रॅम्पमध्ये सतत पाणी जमा व्हायचे. तसेच आसपास जवळ कुणी राहत नसल्याने कुणाला तिच्या ओरडण्याचा आवाज देखील आला नाही. जेव्हा तिला शोधण्यासाठी बाहेर पडले तेव्हा ती गॅरेजच्या रॅम्पच्या गाडी धुण्याच्या खड्ड्यात आढळून आली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.


हेही वाचा – Heavy Rain : मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा जोर कायम


First Published on: August 31, 2020 10:41 AM
Exit mobile version