घरमुंबईHeavy Rain : मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा जोर कायम

Heavy Rain : मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा जोर कायम

Subscribe

गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड कल्याण – डोंबिवलीमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून ऑगस्टच्या शेवटच्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईतील मालाड, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले सारख्या उपनगरात पाऊस धो धो कोसळत आहे. तर दक्षिण मुंबई आणि इतर जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी बरसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळाले नाही. दिवसाढवळ्या ढग दाटून काळोख होतो आणि धो धो पाऊस पडू लागतो. यामुळे हवेत चांगलाच गारवा पसरला असून वातावरणही आल्हाददायी झाले आहे.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून मुंबईसह काही जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरू आहे. मात्र पावसाने गणेश भक्तांना देखील खरेदीची मुभा दिलेली नाही. मुंबईत पावसाची संततधार कायम असून आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. येणारे पुढील चार दिवस मुंबईसह राज्यातील इतर काही भागात पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याआधी २५ ऑगस्टपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार असून मुंबई प्रशासनाला सर्तकतेचा इशारा देण्यात आला होता. गणपती आगमनाच्या एक दिवस आधीच मुंबईत पावसाने जोर धरला आहे.

हेही वाचा –

धक्कादायक : मृतदेहांची अदलाबदल; नाशिकचा मृतदेह थेट मध्यप्रदेशात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -