धारावी नाल्यात डेब्रिज टाकून दाखवला जातो गाळ

धारावी नाल्यात डेब्रिज टाकून दाखवला जातो गाळ

मुंबईतील पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईचे काम जवळपास १००टक्के झाल्याचा दावा केला जात असतानाच शुक्रवारी धारावीतील ६० फुटी रस्त्यांवरील नाल्यातील सफाईचे काम सुरू होते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा आणि महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलेल्या संयुक्त पाहणीमध्ये हा प्रकार दिसून आला आहे. विशेष म्हणजे या पाहणीत नागरिकांनी सफाईबाबत समाधान व्यक्त करतानाच कंत्राटदार नाल्यात डेब्रीज टाकून तेच डेब्रीज गाळ म्हणून उचलत असल्याचा आरोप केला.

धारावीतील ६० फुटी रस्त्यांलगतच्या नालेसफाईच्या कामांची पाहणी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा आणि महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार वर्षा गायकवाड, अमीन पटेल, तसेच नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह पाणी केली. केवळ एकमेव नाल्याची पाहणी करतानाच मिलिंद देवरा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, मुंबईत या नालेसफाई अभावी पाणी तुंबून होणारा त्रास कमी व्हायला हवा.नालेसफाईचे काम करून घेण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. त्यामुळे सफाई झाली नसेल तर त्यांनी ती पूर्ण करावी. आज केवळ एका नाल्याची पाहणी आम्ही करत असलो तरी आम्ही मुंबईतील सर्व नाल्यांवर वॉच तर ठेवणार आहोत असे सांगितले. तर रवी राजा यांनी नालेसफाईचे काम करून घेण्याची जबाबदारी प्रशासनासोबत सत्ताधारी पक्षाची आहे. त्यामुळे त्यांनी यावर लक्ष ठेवून ती करून घ्यावी. परंतु जर ती झाली नसेल, तर सत्ताधारी पक्षाचे अपयश आहे,असे त्यांनी सांगितले.

First Published on: June 15, 2019 5:10 AM
Exit mobile version