चेहरा, नेता, नायक नसलेल्या फेसलेस आंदोलनातून समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य – देवेंद्र फडणवीस

चेहरा, नेता, नायक नसलेल्या फेसलेस आंदोलनातून समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य – देवेंद्र फडणवीस

आज लोकशाहीची अनेक प्रकारची अवस्था आपल्याला पहायला मिळत आहे. लोकशाही सध्या प्रगल्भ होत आहे. पण दुसरीकडे लोकशाहीवर लोकांनी कितीही आघात केला तरीही लोकशाहीला कोणी हानी पोहचवत नाही. कुठलाही विचार न करता फेसलेस आंदोलन करणे हे मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. कुठेतरी लोकशाहीला कमजोर कसे करता येईल, यासाठी विचारपूर्व आणि नियोजनबद्ध काही घटक कार्यरत आहेत. समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या परिषदा घ्यायच्या आणि त्यामधून आंदोलन करायची असे प्रकार सुरू आहेत. अशा परिषदांमध्ये ज्यामध्ये नेता नाही, नायक, नेता चेहरा नाही, फेसलेस आंदोलन अभ्यास न करता लोकशाहीला कमजोर करण्यासाठी केली जात आहे. देशात विदेशी शक्तीच्या माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्नही होत असल्याची टीका राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जेष्ठ विचारवंत आणि माजी संपादक रमेश पतंगे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभाच्या निमित्ताने ते बोलत होते.

देशात सध्या आंदोलनांची स्थिती अशी आहे की, आंदोलन समजून घ्यायच नाही, पण आंदोलन करायची. त्यामधून अशी विचित्र लोकशाहीतील संक्रमणातील अवस्था आपल्याला पहायला मिळत आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीतही मूल्य रूजवण्याचे काम ज्यांनी केले त्यामध्ये रमेशजी आहेत असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले. भारत आणि पाकिस्तान एकाचवेळी स्वतंत्र झाले. दोन्ही देशांनी लोकशाही स्विकारली. पण भारतात लोकशाही रूजली, वाढली. भारतातील लोकशाही ही देशातील सर्वात प्रगल्भ लोकशाही आहे. पण पाकिस्तानात ती कधीच टिकू शकली नाही. पाकिस्तानात हुकुमशाही रूजली. मुळात हिंदू विचार हाच लोकशाहीचा गाभा आहे. हिंदू विचार हा लोकशाहीचा विचार आहे. लोकशाहीमध्ये सहिष्णूता ही लोकशाही विचाराचा स्तंभ आहे. म्हणूनच हा विचार टिकू शकला. लोकशाहीत संविधान पोहचवण्याचे काम जे रमेश पतंगेजी यांनी केले. अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले त्यामध्ये प्रामुख्याने भाषा सोपी ठेवली. अनेकदा विचारवंतांचे विचार डोक्यावरून जातात, पण रमेशजींचे विचार हे डोक्यातही जातात आणि मनातही जातात हे त्यांच्या विचाराच महत्व आहे, असे ते म्हणाले.


 

First Published on: February 15, 2021 9:38 PM
Exit mobile version