धारावीमध्ये १४ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या ३४४ वर

धारावीमध्ये १४ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या ३४४ वर

धारावीत कोरोनाचा वेग मंदावला; दिवसभरात अवघे ७ रुग्ण आढळले

धारावीत पाणी खात्याचे काम करणाऱ्या सात कामगारांना कोरोनाची बाधा झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा धारावीतील १४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीमध्ये आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४४ वर पोहोचली आहे, अशी महापालिकेने दिली आहे.

९० फीट रोड, ६० फीट रोड, माटुंगा लेबर कॅम्प, कोळीवाडा, कुट्टीवाडी, धोरवाडा, ट्रान्झिंट कॅम्प आणि कुंची कुरवी नगर या धारावीमधील भागामध्ये नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत’, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच आतापर्यंत महापालिकेने धारावीमधील ७० हजार नागरिकांची कोरोना चाचणी केली आहे.

माहिममध्ये ३ नवे रुग्ण

धारावी पाठोपाठ आता माहिमध्ये देखील तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एका महिलेचा आणि दोन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हे रुग्ण कोळीवाडा, पोलीस कॉलनी आणि माहिम स्टेशन येथे आढळून आले आहेत.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत शहरात दिवसाला कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यात चिंतेची भर म्हणजे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.


हेही वाचा – कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूत मुंबईची महाराष्ट्राबरोबर तुलना


First Published on: April 29, 2020 9:12 PM
Exit mobile version