Digilocker on WhatsApp: आता व्हॉट्सअॅपवर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करता येणार

Digilocker on WhatsApp: आता व्हॉट्सअॅपवर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करता येणार

व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp ) मदतीने आता पॅन कार्ड (PAN Card), ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) आणि इतर कागदपत्रे डाऊनलोड करता येणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने याबाबत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. डीजीलाॅकर (Digilocker) सेवा वापरण्यासाठी आता WhatsApp वर MyGov हेल्पडेस्कचा वापर करता येणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रती आपल्यासोबत नेहमी ठेवायची नसतील, तर हे नवीन फीचर अतिशय उपयुक्त आहे. म्हणजेच, जर तुम्ही चुकून तुमचा डीजीलाॅकर घरी विसरला असाल, तर तो WhatsApp वर डाऊनलोड करून दाखवून, तुम्ही चालान कापणे टाळू शकाल.

WhatsApp वर डिजिलॉकर वापरण्याची प्रक्रिया
1) सर्वप्रथम  9013151515 हा नंबर फोनमध्ये सेव्ह करावा लागेल. नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्स अॅप ओपन करा.
२) व्हॉट्सअॅप उघडल्यानंतर या नंबरसह चॅट बॉक्स उघडा आणि नंतर ‘नमस्ते’ किंवा ‘हाय’ किंवा ‘डिजिलॉकर’ टाइप करून पाठवा.
3) यानंतर तुम्हाला COWIN सेवा आणि Digilocker सेवा असे दोन पर्याय मिळतील.
4) तुम्ही डिजीलॉकर सेवा निवडताच, आधारची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल.
५) पडताळणी केल्यानंतर तुमच्या डिजीलॉकरमध्ये कोणती कागदपत्रे आहेत ते तुम्हाला कळेल.
6) त्यानंतर त्या दस्तऐवजात जो मोबाईल क्रमांक नोंदणीकृत असेल तो प्रविष्ट करा आणि नंतर तुम्हाला OTP मिळेल.
7) OTP व्हेरिफाय केल्यानंतर आपण कागदजत्र सहजपणे डाउनलोड करू शकता.

8 कोटीहून अधिक लोकांकडून वापर

मार्च 2020 मध्ये कोविडच्या काळात WhatsApp वर MyGov हेल्पडेस्क (पूर्वीचे MyGov कोरोना हेल्पडेस्क ) लोकांना कोविडशी संबंधित माहिती देत ​​असे. यासोबतच लसीचे प्रमाणपत्र बुक करून डाउनलोड करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. आतापर्यंत 8 कोटींहून अधिक लोक हेल्पडेस्कपर्यंत पोहोचले आहेत. तर ३ कोटी ३० लाखांपेक्षा अधिक लस प्रमाणपत्रे डाउनलोड केली गेली आहेत. तसेच देशभरात लाखो लसीकरण बुक केले गेल आहेत.

First Published on: May 24, 2022 8:27 PM
Exit mobile version