मुंबई जीएसटी घोटाळा : 16 विमा कंपन्यांचा तब्बल 824 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस

मुंबई जीएसटी घोटाळा : 16 विमा कंपन्यांचा तब्बल 824 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई विभागातील 16 विमा कंपन्यांनी जीएसटी घोटाळा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल 824 कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा केला आहे. या जीएसटी घोटाळ्यात काही मार्केटिंग कंपन्यांचा हात असल्याचंही DGGIने म्हटलं आहे. याबाबत जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने माहिती दिली आहे. (Directorate General of GST Intelligence Mumbai Zonal Unit detects GST fraud worth to the tune of Rs 824 crore by 16 insurance companies)

तब्बल 824 कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळ्याचा जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने केलेल्या तपासात याचा पर्दाफाश झाला आहे. जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या माहितीनुसार, विमा कंपन्या, मार्केटिंग कंपन्या तसेच अनेक नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून 824 कोटी रुपयांच्या वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी चोरी केली आहे.

या प्रकरणी अधिक चौकशी केली असता, या मार्केटिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीने आयटीसी मंजूर करण्यासाठी एक व्यवस्था उभारली. तसेच एकमेकांच्या सुविधेसाठी बनावट बिले तयार केल्याचे समजले.


हेही वाचा – गिरगाव, माटुंगा येथे जलवाहिनी फुटली; पाणीपुरवठा खंडित

First Published on: September 30, 2022 10:27 PM
Exit mobile version