महापालिकेकडून शिक्षकांच्या बोनसमध्ये भेदभाव

महापालिकेकडून शिक्षकांच्या बोनसमध्ये भेदभाव

मुंबईतील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना २००९ पासून सानुग्रह अनुदान महापालिकेकडून देण्यात येत आहे. मात्र हे अनुदान महापालिकेच्या शिक्षकांपेक्षा कमी आहे. त्यामुळे अनुदानामधील भेदभाव दूर करून महापालिकेने ४ हजार ५०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी मुंबई शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाने केली आहे.

अनुदानित प्राथिमक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना संपूर्ण अनुदान मिळावे, यासाठी मुंबई शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाकडून महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. महापालिकेकडून कर्मचार्‍यांना संपूर्ण वेतन करण्यात येते. परंतु बोनसमध्ये भेदभाव होत असल्याची भावना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांमध्ये आहे. महापालिकेच्या शिक्षकांना संपूर्ण बोनस देण्यात येतो. अनुदानित शिक्षकांवर अन्याय का असा सवाल शिक्षक करत आहेत. महापालिकेने शिक्षकांना देण्यात येत असलेल्या बोनसमधील भेदभाव दूर करावा, अशी मागणी संघटनेने महापालिकेकडे केली आहे. याबाबत संघटनेने शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

First Published on: November 1, 2020 6:50 PM
Exit mobile version