मुंबईतील नगरसेवकांच्या संपत्तीवर टाच

मुंबईतील नगरसेवकांच्या संपत्तीवर टाच

मुंबई पालिका निवडणूक आरक्षणाविरोधात फक्त ३ हरकती

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवणार्‍यांपैकी गेल्या १० वर्षांत १६ नगरसेवकांची पदे बाद झाली आहेत. यामध्ये जातीच्या बोगस प्रमाणपत्रासह दोनहून अधिक अपत्ये असलेल्या नगरसेवकांचाही समावेश आहे. २००७ ते २०१२ या काळात शिरीष चोगले, सुनील चव्हाण, लालजी यादव, रश्मी पहुडकर, नारायण पवार, प्रवीण देव्हारे, विश्वनाथ महाडेश्वर, सुभाष सावंत, अंजुमन असलम, सिमिंतीना नारकर, भारती घोंगडे यांचे पद जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने बाद झाले होते. २०१२ ते २०१७ या काळात चार नगरसेवकांची पदे रद्द झाली आहेत. यामध्ये अनुषा कोडम, भावना जोबनपुत्रा, मोहमद इसाक शेख यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरले. तर सिराज शेख यांचे पद दोनहून अधिक अपत्ये असल्याने रद्द ठरले.

नगरसेवकांनी आपले पद रद्द झाल्यावर मानधन परत न केल्यास अनुसूचित जातीजमाती इतर मागासवर्ग अधिनियम २००० च्या १० (१) पोटकलमानुसार अशी रक्कम वसूल करण्यात येते. या कायद्यानुसार लालजी यादव यांनी 7 हजार 439, अंजुम फातिमा यांनी 45 हजार 388, अनुषा कोडम यांनी 3 लाख 20 हजार 68, भावना जोबनपुत्रा यांनी 3 लाख 65 हजार 428 तर मोहम्मद इसाक शेख यांनी 4 लाख 59 हजार 230 रुपये पालिकेला अदा केलेले नव्हते. पालिकेने या पाचही नगरसेवकांना पत्रव्यवहार केल्यावर अनुषा कोडं व भावना जोबनपुत्रा यांनी अद्याप पालिकेकडे आपले मानधन परत केलेले नाही. यामुळे कायद्यानुसार त्यांच्या संपत्तीमधून ही रक्कम वसूल करावी यासाठी पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती पालिकेच्या अधिकार्‍याने दिली.

नगरसेवकांचे मानधन 
मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना दरमहा १० हजार रुपये मानधन व फोन बिल म्हणून १२५० रुपये दिले जात होते. मोबाईल तसेच लॅपटॉप दिले जात होते. नगरसेवक पद गेल्यावर किंवा कार्यकाळ संपल्यावर लॅपटॉप परत घेतले जात होते. फेब्रुवारी २०१७ च्या निवडणुकीनंतर नगरसेवकांना दरमहा २५ हजार रुपये मानधन, ११०० रुपये मोबाईल बिल, तर समिती अध्यक्षांना ३ हजार रुपये दिले जातात.

First Published on: September 10, 2018 6:30 AM
Exit mobile version