Dongaribuildingcollapse: ‘जे केसरबाईत घडले ते उद्या आमच्यासोबतही घडू शकते’

Dongaribuildingcollapse: ‘जे केसरबाईत घडले ते उद्या आमच्यासोबतही घडू शकते’

जे कैसरबागेत घडले ते उद्या आमच्यासोबत घडेल, पण इलाज नाही - स्थानिक

डोंगरी भागात कोसळलेल्या इमारतीने पुन्हा एकदा अनेक प्रश्नांची आठवण करुन दिली आहे. याअगोदरही मुंबईत इमारत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. ही इमारत धोकादायक होती. कारण ती शंभर वर्षे जुनी होती. मात्र, तरीही स्थानिक तिथे राहत होते. या दुर्घटनेनंतर प्रसारमाध्यमांनी स्थानिकांजवळ घटनेबाबत विचारपूस केली. त्यावेळी फक्त केसरबाईच नाही तर परिसरातील अन्य इमारतीही धोकादायक आहेत. त्यामुळे नागरिक इमारत खाली का करत नाही? असा प्रश्न विचारला गेला. यावेळी नागरिकांनी पर्याय नसल्याचे म्हटले आहे. आमची इमारत धोकादायक आहे, हे आम्हाला माहित आहे. आज जे कैसरबागेत राहणाऱ्या नागरिकांसोबत घडले ते उद्या आमच्यासोबतही घडू शकते. मात्र, यावर प्रशासन डोळे उघडत नाही. आम्ही घर सोडून कुठे राहायला जायचं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – Breaking : मुंबईतील डोंगरीत चार मजली इमारत कोसळली

लहान गल्ली, दाट गर्दी; बचावकार्यास प्रचंड अडचणी

मुंबईच्या डोंगरी भागात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास केसरबाई इमारत कोसळली. हा परिसर अत्यंत दाट वस्तीचा. सीएसएमटी स्थानकाच्या अगदी हाकेच्या अंतरावर परिसर असल्यामुळे परिसरात नेहमी गर्दी. याशिवाय परिसरात फार जुन्या जीर्ण झालेल्या आणि दाटीच्या इमारती आहेत. या इमारतीत १५ कुटुंब राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, छोट्या गल्ल्या असल्यामुळे अग्निशमनदलापुढील आव्हान वाढले आहे. घटनेस्थळी एनडीआरएफचे जवान बचाव कार्यसाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रचंड खटाटोप केली. स्थानिक नागरिक आपापल्या परिने विटा आणि सामान उचलत होते. मात्र, तितक्यावर शक्य नाही.

हेही वाचा – सरकार आता मृतांना पाच लाख देणार, पण दुर्घटना कशा रोखणार? – वारिस पठाण

अग्नीशमनदलापुढे मोठे आव्हान

ही इमारत अत्यंत दाटीच्या परिसरात असल्यामुळे नागरिकांना वाचवण्यात अग्नीशमनदलाच्या जवानांना अडचण येत आहे. छोट्या गल्ल्यांमुळे घटनास्थळी अग्नीशमनदलाची गाडी पोहचू शकत नाही. दरम्यान, ही दुर्घटना सकाळी अकरा वाजता घडली आहे. परंतु, प्रशासनाला एक वाजेपर्यंत जाग आल्याचे स्थानिक नागरिक म्हणत आहेत. त्यामुळे दुर्घटनेनंतर दोन तास स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत दोन बालक आणि एका व्यक्तीला वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे.

हेही वाचा – DongriBuildingCollabs : या घटनांना सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार – नवाब मलिक

First Published on: July 16, 2019 2:03 PM
Exit mobile version