ड्रग्ज प्रकरणी डोंगरी परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, १२ कोटींचे ड्रग्ज जप्त

ड्रग्ज प्रकरणी डोंगरी परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, १२ कोटींचे ड्रग्ज जप्त

एक कोटीच्या एमडीसह नायजेरीयन नागरिकाला अटक

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या तपासादरम्यान राज्यातील ड्रग्स कनेक्शन उघड होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ठिकठिकाणी छापेमारी करत अनेक ड्रग्ज माफियांना ताब्यात घेण्यात आले. यातच मुंबईतील डोंगरी परिसरातही मुंबई पोलिसांनी ड्रग्स विरोधात मोठी कारवाई केली आहे. यात १२ कोटी ५० लाखांचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. डोंगरीतील हायप्रोफाईल इमारतीमध्ये पोलिसांनी धाड टाकली असता हा कोट्यावधींचा साठा आढळून आला. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी तीन जणांना बेड्या ठोकल्या आहे. तर अजूनही शोध मोहिम सुरु आहे.

इसाक इकबाल हसन सय्यद (38), अब्दुल वसीम अब्दुल इजाज शेख(31) आणि मुख्य आरोपी दीपक संजीवा बांगेरा या तीन आरोपींची नावे आहेत. डोंगरी परिसरातील सन फ्लॉवर अपार्टमेंटमधील दीपक बंगेरा याच्या फ्लॅटमधून हा ड्रग्स साठा आढळून आला. कारवाई दरम्यान या घरात पोलिसांना ५ लाखांच्या रोकडसह दोन वजन काटे आणि ड्रग्स पॅकिंग करण्यासाठी लागणारे साहित्यही सापडले आहे. त्यामुळे याठिकाणाहून मुंबईत मोठ्याप्रमाणात ड्रग्सचा सप्लाय होत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी कारवाई दरम्यान हाती लागलेले सर्व साहित्य, रोखड हस्तगत केली आहे. याआधी एनसीबीनेही डोंगरीत छापेमारी करीत लाखोंच्या ड्रग्ससह आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर अनेक आरोपींचा शोध सध्या एनसीबी घेता आहेत. यानंतर डोंगरी पोलिसांची ही या परिसरातील मोठी कारवाई समजली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डोंगरी परिसरात ड्ग्सची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे डोंगरी ड्रग्स माफियांचा मुख्य अड्डा बनत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


हेही वाचा- डोंबिवलीत गॅस सिलेंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू, १ जण जखमी

 

First Published on: February 21, 2021 5:34 PM
Exit mobile version