Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी डोंबिवलीत गॅस सिलेंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू, १ जण जखमी

डोंबिवलीत गॅस सिलेंडरचा स्फोट; एकाचा मृत्यू, १ जण जखमी

डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील कामगार वस्तीला लागलेल्या भीषण आगीत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Related Story

- Advertisement -

भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसीमधील कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत भीषण आग लागल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा आगीची घटना समोर आली आहे. डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील कामगार वस्तीला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. आगीच्या या घटनेमध्ये एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी असून सध्या त्याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमके काय घडले?

डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील रुणवाल मायसिटी फेज २ प्रकल्पाच्या कामगार वस्तीला अचानक भीषण आग लागली. या आगीनंतर अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग आणखीनच भडकली. या आगीत कामगारांच्या तब्बल १२० खोल्या जळून खाक झाल्या. या वस्तीत १७२ कामगार राहत होते. त्यातील एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – पुण्यातील शाळा, महाविद्यालय २८ फेब्रुवारीपर्यंत बंद, रात्रीची संचारबंदी लागू


 

- Advertisement -