देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२८वी जयंती उत्साहात साजरी

देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२८वी जयंती उत्साहात साजरी

Ambedkar Jayanti 2022 : आजपासून 10 दिवस राज्यात 'डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रम', धनंजय मुंडेंची घोषणा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२८ वी जयंती आहे. देशभर आंबेडकर जंयती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुबंईतील दादर येथील चैत्यभूमीवर मध्यरात्रीपासून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला आहे. आंबेडकर जयंती निमित्त मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमीवर जय्यत तयारी केली आहे. देशभरातील लाखो आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जयंती जल्लोषात साजरा केली जात आहे.

मुंबईसह राज्यात जयंती उत्साहात

मुंबईतील वरळी, दादर बीडीडी चाळींमध्ये दरवर्षी आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी देखील आंबेडकर जयंतीनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच, वरळी बीडीडी चाळ परिसरात दक्षिण मुंबईचे महाआघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. राज्यभरात अनेक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी केली जाणार आहे. सोलापूर, अमरावती, भंडारा,औरंगाबाद, जालना, नागपूर या ठिकाणी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. सोलापूरमध्ये पुढील सात दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे.

या राजकीय नेत्यांनी केले अभिवादन

भारतरत्न प्राप्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दारर येथील चैत्यभूमीला आयुक्त अजोय मेहता, राज्यपाल सी. विद्यासारग राव आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी भेट दिली. तसेच त्यांनी आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करताना, आयुक्त अजोय मेहता, राज्यपाल सी. विद्यासारग राव आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर

जयंतीनिमित्त मुंबईत मेगाब्लॉक रद्द

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मुंबईतील तिन्ही मार्गावरील लोकसेवा सेवा राहणार आहेत. पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी असे सांगितले आहे की, ‘रविवारी घेतण्यात येणारा तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.’

First Published on: April 14, 2019 9:30 AM
Exit mobile version