वाहनचालकांनी १० दिवसात दंड न भरल्यास होणार अटक

वाहनचालकांनी १० दिवसात दंड न भरल्यास होणार अटक

Corona Update: १८ तासात पुण्याची दोन हजार वाहने नाशिकमध्ये; थर्मल स्कॅनिंग करा

बेशिस्त वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी वाहतूक पोलीस त्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी रोजच झटत असतो. उपलब्ध मनुष्यबळात आणि साधनसामुग्रमध्ये आपली जबाबजारी पार पाडण्यासाठी पोलिसांची सातत्याने धडपड सुरू असते. मात्र, आता मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांना वाहतूक पोलीस ई चलन आकारतात. नियम मोडणाऱ्या चालकांवर ई चलन प्रणालीत दंड भरण्याची सक्ती केली जात नाही. वाहन, वाहनाची कागदपत्रे किंवा परवाने जप्त केला जात नाही. त्यामुळे दंड भरण्याबाबत चालक गंभीर नाहीत. परिणामी, ही प्रणाली लागू झाल्यानंतर नियम मोडणाऱ्यांना चलन पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आता थकविलेले ई – चलन भरण्यासाठी आणखी १० दिवसांची म्हणजे ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत दंड न भरल्यास वाहन चालकांना आता थेट अटक होणार आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई

येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत एखाद्या वाहन चालकांनी दंड न भरल्यास त्याला थेट नोटीस पाठवलिली जाणार आहे. तसेच सुनावणी वेली ते हजर न राहिल्यास त्यांना वॉरंट काढून अटक करण्यात येईल. तसेच दंडाबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असेही सहपोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितल आहे.

गेल्या आठवड्यात ज्या वाहनांवर पाच हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा दंड भरणे बाकी होते, अशा वाहन मालकांना पोलिसांनी मोबाइलवर संदेश पाठवले असून जर त्या वाहनचालकांनी दंड न भरल्यास प्रकरणे न्यायालयात नेली जातील, असे स्पष्ट केले गेले आहे. तसेच प्रकरण न्यायालयात गेल्यास संबंधित प्रकरणात किती दंड वसूल करावा किंवा मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार काय शिक्षा करावी हा निर्णय न्यायालयाद्वारे घेतला जाणार आहे.


हेही वाचा – उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार, डिसेंबरआधी नवं सरकार – संजय राऊत


 

First Published on: November 20, 2019 12:46 PM
Exit mobile version