घरमुंबईउद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार, डिसेंबरआधी नवं सरकार - संजय राऊत

उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार, डिसेंबरआधी नवं सरकार – संजय राऊत

Subscribe

संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यात डिसेंबरपूर्वीच नवीन सरकार अस्तित्वात येईल आणि गुरुवारी दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, असं जाहीर केलं आहे.

गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेलं राज्यातलं सत्तानाट्य अखेर शेवटाकडे आल्याचं स्पष्ट झालं आहे. संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात महत्त्वापूर्ण माहिती दिली आहे. ‘उद्या म्हणजेच २१ नोव्हेंबर दुपारपर्यंत राज्यात कुणाचं सरकार कसं स्थापन होणार हे स्पष्ट होईल’, असं राऊत यांनी जाहीर केलं आहे. त्यासोबतच, ‘डिसेंबरपूर्वी महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होईल आणि आजच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांनंतर बैठका संपतील’, असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यात सत्तास्थापना आता दृष्टीपथात आली असून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार स्थापन करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

‘डिसेंबरपूर्वी महाराष्ट्रात सरकार बनेल या दृष्टीने प्रक्रिया सुरू आहे. राज्यपालांकडे जेव्हा आम्ही बहुमत घेऊन जाऊ, तेव्हा राज्यपाल आम्हाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण देतील. महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सरकार स्थापन करता आलं नाही. त्यामुळे ती जबाबदारी इतर पक्षांवर आली. उद्या दुपारपर्यंत सगळ्या समस्या सुटलेल्या असतील’, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

राज ठाकरेंचं आजचं व्यंगचित्र पाहिलंत का? – पवारांच्या हातात फुंकणी तर उद्धव ठाकरे टाकतायत सरपण!

‘शरद पवार-मोदी भेट अवकाळीविषयीच’

दरम्यान, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या आज संसदेत होणाऱ्या भेटीवर देखील संजय राऊत बोलले. ‘देशाच्या पंतप्रधानांची कुणी भेट घेतली, तर त्याचा अर्थ तिथे काहीतरी खिचडीच शिजत असायला हवी का? शरद पवार कृषी क्षेत्रातले अभ्यासू नेते आहेत. आम्ही देखील पवारांना नरेंद्र मोदींची भेट घेण्याची विनंती केली होती. ते आता मोदींची भेट घेऊन राज्यातल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देतील. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याच्या अफवा ज्यांना वाटतं की महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये आणि राज्य अस्थिर राहावं, त्यांच्याकडून पसरवल्या जात असतात. अशा अफवांवर कुणी विश्वास ठेऊ नये’, असं देखील राऊत यांनी स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -