अर्ध्या तासाच्या प्रवासाला लागताहेत ४ तास; सामान्य प्रवाशांचे हाल

अर्ध्या तासाच्या प्रवासाला लागताहेत ४ तास; सामान्य प्रवाशांचे हाल

अर्ध्या तासाच्या प्रवासाला लागताहेत ४ तास; सामान्य प्रवाशांचे हाल

कोरोनाविरुद्ध लढत असताना गेले तीन महिने सामन्य मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लोकल बंद आहे. त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. अवघ्या अर्ध्या तासाच्या प्रवासाला तब्बल चार तास लागत आहेत. यामुळे ‘बेस्ट बस इज नॉट बेस्ट, असं म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आलेली आहे. सीएसटी ते भायखळा दरम्यान संध्याकाळी पाच वाजल्यानंतर प्रवास केला तर अर्ध्या तासाच्या प्रवासाला किमान चार तास लागत आहेत. सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रवासी इतर शासकीय कर्मचारी संध्याकाळी पाच वाजता कामावरून सुटल्यानंतर सीएसटी स्थानकाकडे धाव घेतात अशा वेळी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील बेस्ट बसस्टॉप वर मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आझाद मैदान पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. तर संध्याकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत सीएसटी स्थानक परिसरातून जाणाऱ्या बसेसमध्ये गर्दीच गर्दी असते. सीएसटी ते भायखळा हा अर्धा तासाचा प्रवास आहे. परंतु, अनलॉक प्रक्रिया सुरु असून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना वगळता इतर प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यास बंदी असल्यामुळे चार तासाचा प्रवास करावा लागत आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून बस सुटल्यानंतर ती क्रॉफर्ड मार्केट याठिकाणी येईपर्यंत अर्धातास निघून गेलेला असतो. तर पुढे आल्यानंतर ती बस उड्डाणपुलाखाली दोन ते अडीच तास ट्राफिकमध्ये अडकते. तसेच पुढे जेजे उड्डाणपूल नंतर नागपाडा सिग्नल ते भायखळा हा प्रवास सुरू होतो. मात्र, तोही वाहतूक कोंडीतच सुरु होतो. आधीच कोरोना आजारामुळे तोंडावर माक्स घातलेला असतो. बराच वेळ माक्स घातल्याने शरीर घामाघुम होते. त्यात बेस्ट बसमध्ये होणारी गर्दी आणि त्यातून कसाबसा मार्ग काढून प्रवास करावा लागत आहे. त्यात अर्ध्या तासाच्या प्रवासाला चार तास लागत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्याचप्रमाणे एका सीटवर एक प्रवासी असा जो नियम बेस्टमध्ये सुरू आहे. त्यामुळे उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवासी तीन ते चार तास ताटकळत प्रवास करत असतात. जर सीएसटी ते भायखळा दरम्यान प्रवासाला चार तास लागत असतील. तर पुढे सीएसटी ते मानखुर्द या प्रवासाला किती तास लागत असतील याची कल्पना करणे अवघड आहे.


हेही वाचा – पुणे-मुंबई रेल्वे प्रवास कधी होणार सुरू? मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट


 

First Published on: September 4, 2020 1:30 PM
Exit mobile version