चक्रीवादळातील पावसामुळे नालेसफाईच्या कामांची पोलखोल

चक्रीवादळातील पावसामुळे नालेसफाईच्या कामांची पोलखोल

चक्रीवादळातील पावसामुळे नालेसफाईच्या कामांची पोलखोल

सोमवारी मुंबईत तौत्के चक्रीवादळामुळे जोरदार म्हणजे १९४.०० मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे हिंदमाता, अंधेरी सब वे , भायखळा आदी २०-२५ सखल भागात पावसाचे, नाल्याचे पाणी साचल्याचे निदर्शनास आले. पावसापूर्वीच एवढ्या ठिकाणी पाणी साचल्याने पालिकेने केलेल्या नालेसफाईच्या कामांची पोलखोल झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली.त्यामुळे पालिकेच्या आगामी स्थायी समिती बैठकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबईत सोमवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कुलाबा – १८९.०० मिमी तर सांताक्रूझ – १९४.०० मिमी इतक्या पावसाची नोंद पालिकेकडे झाली आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात जोरदार पाऊस पडल्यास सखल भागात वितभर ते हातभर पाणी साचते. त्यामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. पालिका दरवर्षी नालेसफाईच्या कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र तरीही दरवर्षी नाले तुंबतात व नाल्याचे पाणी रस्त्यावर, इतरत्र साचते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्यामुळे नालेसफाईच जर नीटपणे झाली नाही तर अशी परिस्थिती उदभवते.

असाच काहीसा प्रकार सोमवारी घडला. चक्रीवादळ आल्याने जोरदार पाऊस पडला आणि ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले. या घटनाप्रकाराची दखल भाजपचे नेते व आमदार आशिष शेलार यांनीही घेतली असून नालेसफाईच्या कामांवरून सत्ताधारी शिवसेनेला व कंत्राटदारांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


हेही वाचा – पावसात लेप्टो आजारापासून वाचण्यासाठी पालिकेने जाहीर केल्या मार्गदर्शन सुचना

 

First Published on: May 18, 2021 10:56 PM
Exit mobile version