मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

election result of apmc mumbai agriculture market committee

मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे भाजपला खातंही खोलता आलेलं नाही. भाजपाचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. ६ महसूल आणि ४ व्यापारी मतदारसंघात भाजपला एकही विजय न मिळाल्याने महाविकास आघाडीने एपीएमसीवर निर्विवाद वर्चस्व ठेवलं आहे. राज्यातला महाविकासआघाडीचा प्रयोग एपीएमसीमध्येही यशस्वी झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस शेकाप आणि शिवसेना यांनी आपले पॅनल बनवले होते.

या निवडणुकीत कांदा-बटाटा मार्केटमधून अशोक वाळूंज, भाजी मार्केटमधून शंकर पिंगळे, मसाला मार्केटमधून विजय भुता, धान्य मार्केटमधून निलेश वीरा, कामगार मतदारसंघातून शशिकांत शिंदे, फळ मार्केटमधून संजय पानसरे हे निवडून आले आहेत. राज्यातील ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले. मतदानात ६ महसूल विभागात ९८.७२ टक्के तर वाशी मार्केटमध्ये ८७.२१ टक्के मतदान झालं. एकूण सरासरी ९२.५७ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी एकूण ५८ उमेदवार रिंगणात उतरले होते. यासाठी ३४ जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडले. त्याचबरोबर सहा महसूल विभागातून १२ शेतकरी प्रतिनिधी आणि चार व्यापारी प्रतिनिधींची यातून निवड झाली.

First Published on: March 2, 2020 6:00 PM
Exit mobile version