सफाई कामगारांच्या मागण्या सोडविण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सफाई कामगारांच्या मागण्या सोडविण्यासाठी  संयुक्त समिती स्थापन करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ST Workers : "एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच' म्हणत मुख्यमंत्र्यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन

सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. त्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात यावी. जेणेकरून प्रश्न, अडचणीच्या सोडवणुकीसाठी विभागनिहाय आढावा घेऊन निर्णय़ घेणे सुलभ होईल, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले.

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आपल्या मागण्या सादर केल्या. या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टांक, प्रदेशाध्यक्ष जयसिंग कछवा आदींचा समावेश होता.

कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत निश्चितच सकारात्मक विचार कऱण्यात येईल. यातील प्रलंबित, प्रश्न अडचणीच्या सोडवणुकीसाठी समिती स्थापन करण्यात यावी. या समितीमध्ये संघटनेचे पदाधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावा. या समितीने प्रलंबित प्रश्न, अडचणींचा आढावा घेऊन, त्यांच्या सोडवणुकीसाठी पर्याय, शिफारशी कराव्यात. ज्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे शक्य आहे, ते मार्गी लावण्याचे प्रस्ताव, पर्यायही सादर करावेत. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी झालेल्या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक आदी उपस्थित होते.


हेही वाचा – भाजपचा एकही नगरसेवक फुटणार नाही, भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदेंचे प्रत्युत्तर

First Published on: October 18, 2021 7:48 PM
Exit mobile version