डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे फडणवीसांचे निर्देश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे फडणवीसांचे निर्देश

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासूनच त्यांनी कामांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shidne) हे स्वतः राज्यातील विविध भागात जाऊन विकासकामांची पाहणी करत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा स्वतः राज्यातील सर्व कामकाजावर लक्ष ठेऊन आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक (dr. Babasaheb Ambedkar memorial ) बांधण्यात येणार आहे. त्याच संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( dcm devendra fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेतली.

मुंबई मधील इंदू मिल परिसरात हे स्मारक बांधण्यात येणार आहे. त्याच निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले, आम्ही स्मारकाची पाहणी केली आहे. स्मारकाच्या बांधकामाला गती देण्याकरिता आणि त्यामधील काही मुद्द्यांवर निर्णय घेणे गरजेचे आहे ते निर्णय घेण्याकरिता आज आम्ही सर्व या ठिकाणी आलो आहोत. हे काम लवकर पूर्ण करण्याचेसुद्धा निर्देश देण्यात आले आहेत. असे फडणवीस म्हणाले.

याच संदर्भांत देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भांत संपूर्ण आढावा घेतला आहे. प्रेझेंटेशन पाहून मॉडेलची पाहणी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. त्याचबरोबर स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करण्यात यावे असे निर्देश सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( dcm devendra fadnavis) यांनी म्हटले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पाहणी करून झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी स्मारका संबंधी जो आढावा घेतला त्यांची माहिती दिली. यावेळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री (cm eknath shidne) आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत दीपक केसरकर सुद्धा उपस्थित होते.


हे ही वाचा –  ठाकरे-आंबेडकर एकत्र येण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी घेतली राजगृह निवासस्थानी भेट

First Published on: November 16, 2022 5:55 PM
Exit mobile version